शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

चेकमेटच्या राजकारणात नेते अस्वस्थ !

By admin | Updated: August 14, 2014 03:15 IST

सहन होईना आणि सांगताही येईना’, जिल्ह्याच्या राजकारणाची अशीच काहीशी सद्यस्थिती! मोदी लाट काय येऊन गेली, अनेकांमध्ये प्रस्थापितांचा पराभव आपणच करू शकतो

सहन होईना आणि सांगताही येईना’, जिल्ह्याच्या राजकारणाची अशीच काहीशी सद्यस्थिती! मोदी लाट काय येऊन गेली, अनेकांमध्ये प्रस्थापितांचा पराभव आपणच करू शकतो, असा विश्वास दाटून आलाय. परिणाम काय तर अनेक मतदारसंघात बंडाचे झेंडे! आघाडी काय किंवा महायुती काय परिस्थिती सारखीच! राजकीय पटलावरील ‘चेकमेट’ एवढा वधारलाय की काही नेते आणि पक्ष कमालीचे अस्वस्थ आहेत.नुकतीच आटोपलेली लोकसभा निवडणूक याचे ठसठशीत उदाहरण. दोन्ही खासदार अर्थातच महायुतीचे! बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे-पाटील काँग्रेसकडून तर मधुकर पिचड राष्ट्रवादीकडून राज्य मंत्रिमंडळात. असे असूनही ‘आघाडीचे जिल्ह्यावर वर्चस्व आहे’ अशी नोंद करणे आता धाडसाचे ठरेल. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तर ‘दल-बदलू’ हवा एवढी वेगात आहे, की कोणत्या पक्षात कोण असेल, याचाच मेळ लागेना. सर्वाधिक झळ बसतेय ती राष्ट्रवादीला. अलीकडेच राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते पक्ष सोडणार, हे जवळपास निश्चित मानले जाते. पण भाजपात जाणार की नाही, हा संभ्रम कायम आहे. काँग्रेसतर्फे संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात, शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे, राष्ट्रवादीतर्फे नेवासा मतदारसंघात शंकरराव गडाख, पाथर्डी-शेवगावमध्ये चंद्रशेखर घुले, शिवसेनेतर्फे अहमदनगर मतदारसंघात अनिल राठोड, पारनेरमध्ये विजय औटी, कोपरगावात अशोक काळे, भाजपातर्फे राहुरीतून शिवाजी कर्डिले या विद्यमान आमदारांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. श्रीगोंद्यात पाचपुते प्रकरणामुळे संभ्रम वाढला आहे तर अकोले मतदारसंघात राष्ट्रवादीकडून स्वत: मधुकर पिचड लढणार की त्यांचे पुत्र वैभव यावरून अद्याप पडदा उघडलेला नाही. कर्जत-जामखेडमध्ये भाजपाचे आ. राम शिंदे यांच्या उमेदवारीला अनपेक्षितपणे पक्षांतर्गत विरोध समोर आला आहे. कोपरगावात राष्ट्रवादीतर्फे बिपीनदादा कोल्हे मैदानात असतील. तिकिटासाठी जिल्ह्यात सध्या महायुतीकडे रांगा आहेत.