शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तांसाठी राष्ट्रवादीचे जेल भरो

By admin | Updated: September 4, 2015 00:51 IST

आजवरच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत अशा प्रकारची दुष्काळी परिस्थिती आपण पहिल्यांदा अनुभवत आहोत, परतीचा पाऊस नीट झाला नाहीतर आणखी गंभीर अवस्था होऊ शकते,

मुंबई : आजवरच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत अशा प्रकारची दुष्काळी परिस्थिती आपण पहिल्यांदा अनुभवत आहोत, परतीचा पाऊस नीट झाला नाहीतर आणखी गंभीर अवस्था होऊ शकते, असे सांगत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पक्षनेत्यांना केले. त्याचवेळी सरकारवर दबाव आणण्यासाठी जेलभरो आंदोलनाची हाकही दिली.राज्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीवर पक्षाची भूमिका ठरविण्यासाठी खा. पवार यांनी गुरुवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक घेतली. प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे, खा. प्रफुल पटेल, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, सभापती रामराजे निंबाळकर, उपसभापती वसंत डावखरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे गटनेते जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील आदी नेते उपस्थित होते. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची माहिती या वेळी पवार यांनी विभागनिहाय नेत्यांकडून घेतली. सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांची वीज बिले माफ करावित, चारा छावण्या सुरू कराव्यात, परंतु शक्यतो दावणीला चारा देण्याची व्यवस्था करावी आणि दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची फी माफ करावी, आदी मागण्या सरकारपुढे मांडण्याचे बैठकीत ठरले.परिस्थिती अत्यंत गंभीर असून, मंत्रीच नाहीतर विरोधकांनादेखील ग्रामीण भागात फिरणे मुश्कील होईल, अशी भीतीही खा. पवार यांनी या वेळी बोलून दाखवली. (विशेष प्रतिनिधी)