शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीला आघाडी तोडण्याची घाई!

By admin | Updated: August 13, 2014 02:57 IST

विधान परिषद पोटनिवडणुकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उमेदवारीचा विषय प्रतिष्ठेचा करून त्यानिमित्ताने काँग्रेससोबतची आघाडीच तोडण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मनसुबे असल्याचे आता म्हटले जात आहे.

मुंबई : विधान परिषद पोटनिवडणुकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उमेदवारीचा विषय प्रतिष्ठेचा करून त्यानिमित्ताने काँग्रेससोबतची आघाडीच तोडण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मनसुबे असल्याचे आता म्हटले जात आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाशी कुठलीही चर्चा न करता तटकरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. त्याआधी त्यांनी विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा दिला. काँग्रेसवर दबाव आणण्यासाठी हे सगळे करण्यात आले आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडीच करायची नाही यासाठीचे कारण यानिमित्ताने शोधले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढावे, असा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सुरुवातीपासून आग्रह असल्याचे म्हटले जाते. त्यांचे खंदे समर्थक तटकरे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून दोघांनी स्वबळासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर दबाव वाढविल्याचे म्हटले जाते. त्यातच स्वबळावर लढल्यास राष्ट्रवादीच्या जागा वाढतील, असे सर्वेक्षण समोर येत असल्याने त्यांचा वापरही आपला मुद्दा रेटण्यासाठी करून घेतला जात आहे.काँग्रेस पक्ष मोहन जोशी यांच्या उमेदवारीवर ठाम राहिला तर आघाडी तोडण्याची धमकी राष्ट्रवादीकडून दिली जाऊ शकते. त्यावर काँग्रेसकडून काय प्रतिसाद येतो, यावर आघाडीचे भवितव्य अवलंबून असेल. विधान परिषदेची जागा काँग्रेसची नाही, ती दोघांसाठीही खुली आहे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकारांना सांगितले. दोन्ही पक्षांच्या समन्वय समितीचे संयोजक म्हणून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान परिषदेच्या जागेबाबत आम्हाला विश्वासात घेऊन आधी निर्णय करायला हवा होता, असे सांगून त्यांनी आज निर्माण झालेल्या तिढ्यासाठी मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरले. (विशेष प्रतिनिधी)