शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
3
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
4
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
5
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
6
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
7
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
8
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
9
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
10
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
11
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
12
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
13
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
14
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
15
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
16
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
17
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
18
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
19
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
20
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?

'मी राष्ट्रवादीचा आमदार' असं म्हणत रोहित पवारांनी केला 'या' संघटनेला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 10:15 IST

तरुणांमध्ये रोहित पवार यांची क्रेझ आहे. सोशल मीडियावरही त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतो. त्यामुळेच काही तरुणांनी एकत्र येऊन रोहित पवार यांच्या नावे अराजकीय संघटना स्थापन केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या नावाने एक अराजकीय संघटना स्थापन करण्यात आली आहे. या संघटनेला रोहित पवार यांनी विरोध केला आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरूनच याबाबत माहिती दिली आहे. तसेच 'मी राष्ट्रवादीचा आमदार असताना अशी स्वतंत्र संघटना काढणं योग्य नाही. त्याऐवजी आपण एकत्रितपणे सामाजिक काम करत राहू' असं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

तरुणांमध्ये रोहित पवार यांची क्रेझ आहे. सोशल मीडियावरही त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतो. त्यामुळेच काही तरुणांनी एकत्र येऊन रोहित पवार यांच्या नावे अराजकीय संघटना स्थापन केली आहे. मात्र रोहित यांनी याची गंभीर दखल घेऊन तरुणांना आपण राष्ट्रवादीचे आमदार असल्याची जाणीव करून दिली आहे. तसेच मंगळवारी (1 सप्टेंबर) ट्विटरवरून आपली नाराजी व्यक्त केली आहे. 

"माझ्यावर प्रेम करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी माझ्या नावे अराजकीय संघटना सुरू केल्याचं समजलं. या सर्वांना माझी विनंती आहे की, मी राष्ट्रवादीचा आमदार असताना अशी स्वतंत्र संघटना काढणं योग्य नाही. त्याऐवजी आपण एकत्रितपणे सामाजिक काम करत राहू. कार्यकर्ता म्हणून मीही नेहमीच तुमच्यासोबत राहील" असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

काही कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन 'रोहित पवार युवा ब्रिगेड' नावाची अराजकीय संघटना स्थापन केल्याची माहिती मिळत आहे. पवार यांची कोणतीही परवानगी न घेता ही संघटना स्थापन करण्यात आली असून या संघटनेनं कार्यही सुरू केलं आहे. मात्र याबाबत जेव्हा रोहित पवार यांना माहिती मिळाली तेव्हा त्यांनी अशी स्वतंत्र संघटना काढणं योग्य नसल्याचं म्हणत कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीचे आमदार असल्याची जाणीव करून दिली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

एकापेक्षा जास्त बँक खाती असणं पडू शकतं महागात, 'हे' आहे कारण

CoronaVirus News : चिंता वाढली! लक्षणं नसलेल्या रुग्णांना कोरोनाचा सर्वाधिक धोका, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

CoronaVirus News : कोरोना लसीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, म्हणाले...

भारीच! App ओपन न करता WhatsApp वर करता येतो झटपट मेसेज, जाणून घ्या नेमकं कसं?

CoronaVirus News : दिल्ली, मुंबई नाही तर 'हे' शहर आहे कोरोनाचा नवा हॉटस्पॉट, चिंताजनक आकडेवारी

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस