CoronaVirus News : दिल्ली, मुंबई नाही तर 'हे' शहर आहे कोरोनाचा नवा हॉटस्पॉट, चिंताजनक आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 01:20 PM2020-09-01T13:20:19+5:302020-09-01T13:24:34+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे.

CoronaVirus Marathi News pune overtakes delhi nowhighest number covid cases | CoronaVirus News : दिल्ली, मुंबई नाही तर 'हे' शहर आहे कोरोनाचा नवा हॉटस्पॉट, चिंताजनक आकडेवारी

CoronaVirus News : दिल्ली, मुंबई नाही तर 'हे' शहर आहे कोरोनाचा नवा हॉटस्पॉट, चिंताजनक आकडेवारी

Next

नवी दिल्ली - वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. रुग्णांचा आकडा हा तब्बल 36,91,167 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 69,921 नवे रुग्ण आढळले असून 819 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 65,288 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई हा कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळखला जात होता. मात्र आता मुंबई आणि दिल्लीला मागे टाकत पुणे हे शहर देशातील कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनला आहे. पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सर्वात जास्त असल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीमध्ये सोमवारपर्यंत कोरोनाचे 1,74,748 रुग्ण आढळून आले आहेत. तर पुण्यात 31 ऑगस्टपर्यंत तब्बल 175,105 कोरोनाग्रस्त आढळून आल्याची माहिती मिळत आहे. 

कोरोना व्हायरसमुळे पुण्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. अनेक रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. पुण्यामध्ये आतापर्यंत 4069 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 1,18,324 लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. तसेच सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, मास्क, होम आयसोलेशन यासारखे उपाय केले जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

CoronaVirus News : कोरोनाचा भयावह वेग! उपचारासाठी दाखल झाल्यानंतर 24 तासांत 31 टक्के रुग्णांचा मृत्यू

कोरोना रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल होताच 24 तासांत 31 टक्के रुग्णांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले आहे. पण याच दरम्यान कोरोनाचा धडकी भरवणारा वेगही समोर आला आहे. कोरोनाची लक्षणं जाणवत नसतानाही अनेकांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह येत आहे. वेळीच कोरोनाचा धोका लक्षात न आल्यामुळे तसेच वेळेत उपचारासाठी दाखल न झाल्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांचे विश्लेषण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीने दिलेल्या रिपोर्टमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

झोपाळू लोकांसाठी सुवर्णसंधी! ऑफिसमध्ये काम नाही तर झोपा काढा अन् 1 लाख कमवा

प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! आणखी 100 ट्रेन धावण्याची शक्यता, लवकरच मिळू शकतो दिलासा?

"'मन की बात'च्या व्हिडीओवरील 'डिस्लाईक' मागे काँग्रेस"

बापरे! अचानक गेली वीज, तब्बल 20 तास ट्रेनमध्ये अडकले हजारो प्रवासी

भयंकर! लपाछपी खेळण्याच्या बहाण्याने 7 मुलांनी केला 8 वर्षीय मुलीवर बलात्कार

 

Web Title: CoronaVirus Marathi News pune overtakes delhi nowhighest number covid cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.