एकापेक्षा जास्त बँक खाती असणं पडू शकतं महागात, 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 09:23 AM2020-09-02T09:23:14+5:302020-09-02T09:42:39+5:30

कोणतेही कारण नसताना अनेक बँकांमध्ये खातं उघडलं असल्यास ते महागात पडण्याची शक्यता आहे.

have multiple bank accounts you can come on incom tax department radar | एकापेक्षा जास्त बँक खाती असणं पडू शकतं महागात, 'हे' आहे कारण

एकापेक्षा जास्त बँक खाती असणं पडू शकतं महागात, 'हे' आहे कारण

Next

नवी दिल्ली - विविध बँकेमध्ये काही लोकांची अनेक खाती असतात. मात्र कोणतेही कारण नसताना अनेक बँकांमध्ये खातं उघडलं असल्यास (Multiple Bank Account) ते महागात पडण्याची शक्यता आहे. असं असल्यास संबंधित व्यक्ती ही आयकर विभागाच्या रडारवर येऊ शकते. जर एखादं खातं वापरत नसाल तर ते बंद करणं गरजेचं आहे. कारण आयकर विभागाची सर्व गोष्टींवर नजर असते. ते अशा खात्यांची तपासणी करत असतात. 

काळा पैसा पांढरा करण्यासाठी (Money Laundering) अशाप्रकारे अनेक खाती उघडल्याचा समज आयकर विभागाकडून केला जाऊ शकतो. कोणत्याही व्यक्तीला कितीही बँकांमध्ये खाते उघडण्यास मनाई करेल असा कोणताही कायदा देशामध्ये नाही. मात्र आयकर विभागाची नजर सर्वच गोष्टींवर असते. त्यामुळे अशाप्रकारे अनेक बँकेत खाती असल्यास त्याला डमी खातं समजलं जाऊ शकतं. एखाद्या खोट्या कंपनीशी ते खाते संबंधित नाही ना असा तपास केला जाऊ शकतो.

अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता बँकांकडून नियमित स्वरुपात सर्व सूचना आयकर विभागाकडे दिल्या जात आहेत. कोणती व्यक्ती मोठ्या रकमेचे ट्रान्झॅक्शन करते आहे, याबाबत बँकेकडून आयकर विभागास माहिती दिली जाते. त्याचप्रमाणे एकाच पॅन नंबरवर किती खाती आहेत, याची माहिती देखील एका क्लिकवर मिळू शकते. जर एखादी व्यक्ती वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या बँकांमध्ये खाते उघडत असेल तर ते संशयास्पद ठरू शकतं. 

काही वर्षांपूर्वी बँकांमध्ये सेंट्रलाइज्ड बँकिंग सिस्टिम नव्हती. तेव्हा शहरात काम करणारे व्यक्ती त्या त्या शहरात त्यांचे बँक खाते उघडत असत कारण दुसऱ्या शहरातील बँकेतून चेक क्लीअर होण्यासाठी जास्त वेळ जात होता. मात्र आता कमी वेळात पैसे ट्रान्सफर होतात. आयकर विभागाने ET ला दिलेल्या माहितीनुसार, अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. काही दिवसांपूर्वी गाझियाबादमध्ये एका व्यक्तीला पकडण्यात आले होते, ज्याने खासगी आणि सरकारी बँकांमध्ये मिळून 80 खाती उघडली होती. आयकर विभागाला असा संशय होता की त्याने 380 कोटींचे मनी लाँड्रिंग केले आहे. त्याचप्रमाणे नोटबंदीच्या वेळी दिल्लीमध्ये एक व्यक्ती सापडला होता जो काश्मीरी गेटच्या मोटर पार्ट्स मार्केटमध्ये काम करायचा आणि त्याचे 20 हून अधिक बँक खाती होती. त्याचा कोणताही पत्ता देखील नव्हता. मात्र नोटबंदीच्या काळात त्याच्या खात्यामध्ये लाखोंचा व्यवहार झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : चिंता वाढली! लक्षणं नसलेल्या रुग्णांना कोरोनाचा सर्वाधिक धोका, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

CoronaVirus News : कोरोना लसीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, म्हणाले...

भारीच! App ओपन न करता WhatsApp वर करता येतो झटपट मेसेज, जाणून घ्या नेमकं कसं?

CoronaVirus News : दिल्ली, मुंबई नाही तर 'हे' शहर आहे कोरोनाचा नवा हॉटस्पॉट, चिंताजनक आकडेवारी

झोपाळू लोकांसाठी सुवर्णसंधी! ऑफिसमध्ये काम नाही तर झोपा काढा अन् 1 लाख कमवा

प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! आणखी 100 ट्रेन धावण्याची शक्यता, लवकरच मिळू शकतो दिलासा?

Web Title: have multiple bank accounts you can come on incom tax department radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.