Corona Vaccine: “राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील, यासाठी एखादं पत्र केंद्राला जरुर लिहावं”

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 01:48 PM2021-05-09T13:48:27+5:302021-05-09T13:52:04+5:30

Corona Vaccine: कोरोनाच्या संदर्भात आभासी चित्र रंगवले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. याला आता महाविकास आघाडीकडून प्रत्युत्तर दिले जात आहे.

ncp rohit pawar criticises devendra fadnavis on corona vaccine shortage in state | Corona Vaccine: “राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील, यासाठी एखादं पत्र केंद्राला जरुर लिहावं”

Corona Vaccine: “राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील, यासाठी एखादं पत्र केंद्राला जरुर लिहावं”

Next
ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्रराज्याला पुरेशा लसी कशा मिळतील, यासाठी एखादं पत्र केंद्राला जरुर लिहावंरोहित पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

मुंबई: देशभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते. मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक ठिकाणी कोरोनाचा कहर कायम असल्याचे दिसून येत आहे. मात्र, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा लपवला जात असून, कोरोनाच्या संदर्भात आभासी चित्र रंगवले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. याला आता महाविकास आघाडीकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. शिवसेनेने टीका केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रसकडूनही पलटवार करण्यात आला आहे. राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील, यासाठी एखादे पत्र केंद्राला जरुर लिहावे, असा टोला लगावण्यात आला आहे. (ncp rohit pawar criticises devendra fadnavis on corona vaccine shortage in state)

महाराष्ट्रावरील करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेलं संकट अद्यापही दूर झालेले नाही. असे असतानाही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची आकडेवारी लपवली जात असल्याचा आरोप भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या आरोपाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले.

“देवेंद्र फडणवीसच आभासी”; मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरून शिवसेनेचा पलटवार

एखादे पत्र केंद्राला जरुर लिहावे

कोविडच्या लढ्याबाबत पंतप्रधान आणि सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचं कौतुक केलं, त्यामुळं राज्यातील विरोधकांनी केवळ राजकीय टीका न करता राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील, यासाठी एखादं पत्र केंद्रालाही जरुर लिहावं!, असा टोला लगावत, आणि कोविडच्या मृतांची आकडेवारी लपवण्याबाबत बोलायचं तर आज हे भाजपशासित राज्यांना सांगण्याची खरी गरज आहे. कोविडचा हा लढा संपलेला नाही, त्यामुळं राजकीय टीका-टिप्पणी टाळून सर्वांनाच हा लढा एकत्रित लढावा लागणार आहे. त्यासाठी प्रयत्न करुयात!, असे आवाहन रोहित पवार यांनी ट्विटरवरून केले आहे. 

फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबईतील कोरोना मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे, असे घडत आहे. त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता कोरोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होतेय. हे प्रकार तत्काळ थांबविण्यात यावेत, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे. 

तुमच्या देवाचे हात रक्ताने माखले आहेत; अमेरिकेतील मोदी भक्तांना खुले पत्र

दरम्यान, शनिवारी दिवसभरात राज्यात ८२ हजार २६६ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, ५३ हजार ६०५ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, ८६४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात एकूण ४३,४७,५९२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट ८६.०३ टक्के एवढे झाले आहे. 
 

Web Title: ncp rohit pawar criticises devendra fadnavis on corona vaccine shortage in state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.