"अल्पमतात आहोत विरोधी बाकावर बसू ...", शरद पवारांचा दाखला देत आव्हाडांची फेसबुक पोस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 11:26 PM2022-07-17T23:26:49+5:302022-07-17T23:42:01+5:30

Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी 1995 साली शरद पवार हे काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना काँग्रेस सत्तेतून बाहेर गेली, त्यावेळेच्या प्रसंगाचा दाखला देत फेसबुक पोस्ट केली आहे.

ncp leader jitendra awhad fb post on ncp chief sharad pawar on maharashtra politics crisis | "अल्पमतात आहोत विरोधी बाकावर बसू ...", शरद पवारांचा दाखला देत आव्हाडांची फेसबुक पोस्ट!

"अल्पमतात आहोत विरोधी बाकावर बसू ...", शरद पवारांचा दाखला देत आव्हाडांची फेसबुक पोस्ट!

googlenewsNext

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर भाजपसोबत हातमिळवणी करुन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडाविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावर आता 20 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. यादरम्यान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी 1995 साली शरद पवार हे काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना काँग्रेस सत्तेतून बाहेर गेली, त्यावेळेच्या प्रसंगाचा दाखला देत फेसबुक पोस्ट केली आहे. तसेच, या पोस्टला "अल्पमतात आहोत विरोधी बाकावर बसू .." असे जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. 

फेसबुकद्वारे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत की, "1995 साली जेव्हा पहिल्यांदा युती सरकार विजयी झाले. म्हणजे पहिले बिगर काँग्रेस सरकार आले. तेव्हा आदरणीय शरद पवार साहेब हे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. आणि ते मुख्यमंत्री असतानाच काँग्रेस सत्तेतून बाहेर गेली. ते वर्षा बंगल्यावर राहत होते. त्यावेळेस मोबाईल नव्हते आणि बॅलेट पेपरवरती मोजणी चालू होती. त्यामुळे निकाल यायला उशीर लागत होते. निकाल जसजसे येत गेले तसे वर्षा बंगल्यावर उपस्थित असलेल्या सगळ्यांना जाणीव झाली की काँग्रेस बहुमत प्राप्त करू शकत नाही. ठरवलं असत तर बहुमत प्राप्तही करू शकली असती."

पुढे लिहिले आहे की, "पण, मला आठवतंय कि दुसऱ्याच दिवशी मी स्वतः वर्षा बंगल्यावर उपस्थित होतो निकाल लागण्यापासून ते मनोहर जोशी यांचा शपथविधी होईपर्यंत. साहेबांकडे गेलेले ज्येष्ठ नेते.. त्यांची नावे मी इथे लिहू इच्छित नाही. त्या सगळ्यांनी साहेबांना आग्रह करत होते कि साहेब सरकार बनवूया. आपण सरकार बनवू शकता. तेव्हा साहेबांच वाक्य होतं.. 'जनमत आपल्या विरोधात आहे. असं सरकार बनवणं योग्य नाही. त्यामुळे आपण विरोधी बाकावर बसायला हवं.' हे वाक्य त्यांचे म्हणजेच पवार साहेबांचे आहे आहे दिल्ली चा किंवा काँग्रेस हायकमांडचा काही ही संबंध नव्हता."

याचबरोबर, "मी ह्या सगळ्याचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे, साहेबांची राजकीय जीवनातली 60% वर्ष हि विरोधी बाकावर बसण्यात गेली आहेत. साहेब पहिल्यांदा 1967 ला निवडून आले तेव्हा पासून आज पर्यंत ते विधी मंडळाचे नाहीतर संसदेचे सदस्य आहेत. अर्धवट माहितीच्या आधारे महाराष्ट्राची दिशाभूल करणाऱ्यांसाठी मी हे लिहित आहे." असा टोला देखील जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांना लगावला आहे.

Web Title: ncp leader jitendra awhad fb post on ncp chief sharad pawar on maharashtra politics crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.