Maharashtra Politics: पार्थ पवार-शंभुराज देसाई भेटीवर अजितदादांची प्रतिक्रिया; म्हणाले, “राजकीय विरोधक शत्रू...”  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 11:05 AM2023-01-21T11:05:06+5:302023-01-21T11:05:59+5:30

Maharashtra News: पार्थ पवार आणि शंभुराज देसाई यांच्या भेटीचे अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे समर्थन केल्याचे सांगितले जात आहे.

ncp ajit pawar reaction over parth pawar and shinde group shambhuraj desai meet | Maharashtra Politics: पार्थ पवार-शंभुराज देसाई भेटीवर अजितदादांची प्रतिक्रिया; म्हणाले, “राजकीय विरोधक शत्रू...”  

Maharashtra Politics: पार्थ पवार-शंभुराज देसाई भेटीवर अजितदादांची प्रतिक्रिया; म्हणाले, “राजकीय विरोधक शत्रू...”  

googlenewsNext

Maharashtra Politics: अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी शिंदे गटातील नेते शंभुराज देसाई यांची भेट घेतली. या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. यानंतर आता खुद्द अजित पवार यांनी पार्थ पवार आणि शंभुराज देसाई यांच्या भेटीवर थेट शब्दांत भाष्य करताना रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. 

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांना पार्थ पवार आणि शंभुराज देसाई यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर, राजकीय विरोधक म्हणजे कुणी दुष्मन नव्हे. एकमेकावर राजकीय टीकात्मक बोलले तरी विकास कामाबाबत चर्चा, संवाद होतच असतो. मी मंत्री असताना अनेक राजकीय नेते भेटत होतो. अशा अनौपचारिक बैठकीमध्ये विकास कामाबाबत चर्चाही केली जाते. आमचे पक्ष निराळे आहे म्हणजे राजकीय दुष्मनी नाही. सत्ताधारी, विरोधक म्हणजे आम्ही काही शत्रू नाही, हे  समजून घ्यावे, असे अजित पवार यांनी सांगितले. 

हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार एकमेकाबद्दल टीकात्मक भाषण करायचे. पण एकत्र भेटल्यावर मैत्रीपूर्ण बोलायचे आणि हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे, असे अजित पवार यांनी नमूद केले. दुसरीकडे, पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावर अजित पवार यांनी टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये झालेला कार्यक्रम हा मुंबई महापालिका निवडणूक नजरेसमोर ठेवून झाला असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले जात आहे, असे अजित पवार म्हणाले. 

दरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पार्थ पवार आणि शुंभराज देसाई यांच्या भेटीवरून राष्ट्रवादीवर टीका केली आहे. पार्थ पवार हे नाराज असतील म्हणूनच त्यांनी शंभूराज देसाई यांची भेट घेतली असावी. कारण, रोहित पवार हे विधानसभेचे सदस्य आहेत, मुंबई क्रिकेट मंडळाचे अध्यक्षही तेच झाले. त्यामुळे पार्थ नाराज असू शकतात. घरातून, आजोबांकडून अन्याय होत असेल म्हणून शंभुराज देसाईंची भेट घेतली असेल, पार्थ यांनाही राजकारणात स्थिर व्हायचे असेल, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: ncp ajit pawar reaction over parth pawar and shinde group shambhuraj desai meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.