शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

नाथाभाऊ ‘आरे’च्चा!

By admin | Updated: June 11, 2015 03:07 IST

आरे कॉलनीत मेट्रो रेल्वे कारशेडकरिता जागा देण्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यातील विसंवाद काल महाराष्ट्राने अनुभवला.

मुंबई : आरे कॉलनीत मेट्रो रेल्वे कारशेडकरिता जागा देण्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यातील विसंवाद काल महाराष्ट्राने अनुभवला. कारशेडसाठी अन्य पर्याय नसल्याने आरेतील जागा द्यावी लागेल, असे वक्तव्य खडसे यांनी वृत्तवाहिनीवर करताच फडणवीस यांनी टिष्ट्वट करून असा कुठलाही निर्णय झालेला नसून अफवांवर विश्वास ठेवू नका, असे स्पष्ट केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विदेश दौऱ्यानंतर मायदेशी परतले असताना खडसे यांनी कारशेडचा विषय छेडून मुख्यमंत्री फडणवीस यांची कोंडी करण्याची खेळी खेळल्याचे बोलले जात आहे.मेट्रो कारशेडकरिता आरे कॉलनीमधील ३० हेक्टर जमीन देण्याच्या प्रस्तावाला शिवसेना व मनसेचा कडाडून विरोध आहे. पर्यावरणवादी संघटनांनीही विरोधाचे निशाण फडकवले आहे. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी बुधवारी आरे कॉलनीला भेट देऊन पाहणी केली. या वेळी मेट्रोच्या कारशेडबाबत आरे व एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर खडसे म्हणाले, की याबाबत सरकारने तज्ज्ञांची समिती नेमली आहे. मेट्रो कारशेडकरिता आरेची जागा दिली नाही तर मेट्रो प्रकल्प रद्द करावा लागेल. आता मेट्रो प्रकल्प रद्द करून लोकांची गैरसोय करायची की अन्य जागेचा पर्याय नसल्यास हीच जागा द्यायची, याचा निर्णय समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर करावा लागेल.