शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जनांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नारळीकरांना साहित्य अकादमी पुरस्कार

By admin | Updated: December 20, 2014 03:02 IST

साहित्य क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठीत साहित्य अकादमी पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली

मुंबई : साहित्य क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठीत साहित्य अकादमी पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक व शास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि गोव्यातील ज्येष्ठ साहित्यिका माधवी सरदेसाई यांना साहित्य अकादमीच्या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. जयंत नारळीकर यांना ‘चार नगरातले माझे विश्व’ या आत्मकथनात्मक पुस्तकासाठी तर माधवी सरदेसाई यांना कोकणी भाषेतील ‘मंथन’ या लेखसंग्रहासाठी गौरवण्यात येणार आहे.गोवा विद्यापीठातील कोकणी विभागात ज्येष्ठ व्याख्यात्या असलेल्या माधवी सरदेसाई ‘जाग’ या कोकणी नियतकालिकाच्या संपादक आहेत. कोकणी साहित्यातील संशोधनात्मक लेखनात त्यांचे मोलाचे योगदान आहे. साहित्य अकादमी पुरस्काराच्या इतर मानकऱ्यांमध्ये आसामी-अरूपा पतंगिया कलिटा (मरियम अस्टिन अथाबा हिरा बारुआ), बंगाली- उत्पलकुमार बासू (पिया माना भाबे), बोडो-उरखाओ ग्वरा ब्रह्मा (उदग्नीफ्राय गिदिंगफिनाय), डोगरी- शैलेंद्र सिंग (हाशिये पार), गुजराती- कै. अश्विन मेहता (छबी भितरनी), इंग्रजी- अदिल जुस्सावाला (ट्रायिंग टू से गुडबाय), हिंदी- रमेशचंद्र शहा (विनायक), कन्नड- जी. एच. नायक (उत्तरार्ध), काश्मिरी- शद रमझान (कोरे ककुड पुशरिथ गोमे), मैथिली- आशा मिश्रा (उचट), मल्याळाम- शुभाष चंद्रन (मनुष्यानू ओरू आमुखम), नेपाळी - नंद हंखिम (सत्ताग्रहण), उडिया- गोपाळकृष्ण रथ (बिपुला डिगांथा), पंजाबी- जसविंदर (अगरबत्ती), राजस्थानी- रामपाल सिंग राजपुरोहित (सुंदर नैन सुधा), संथाली- जमदर किस्कु (माला मुदाम), सिंधी- गोपी कमल (सिजा अज्ञान बुकु), तमिळ- पुमानी (अंगनगदी), तेलगु- रचपालेम चंद्रशेखर रेड्डी (मना नवलालू- मना कथनीकालू) आणि ऊर्दू- मुन्नवर राणा (शहदाबा). केळेकर यांना पुरस्कार अर्पणपणजी : आपल्याला जे गवसले ते सुलभ भाषेतून इतरांसमोर मांडताना या साहित्याच्या मननातून संशोधनाच्या वाटेवरून जाण्याची प्रेरणा इतरांनाही मिळावी, हाच हेतू आपण बाळगून आहोत, अशी भावना डॉ. माधवी सरदेसाई यांनी व्यक्त केली. हा पुरस्कार कोकणी साहित्याचे भीष्माचार्य रविन्द्र केळेकर यांना अर्पण केला. सरदेसाई यांना या आधी साहित्य अकादमीचा भाषांतराचा पुरस्कारही लाभला आहे. (प्रतिनिधी)