शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार बंदला हिंसक वळण

By admin | Updated: February 5, 2015 01:34 IST

अवैध कत्तलखाने बंद करण्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या जिल्हा बंदला शहरात सायंकाळी हिंसक वळण लागले.

नंदुरबार : अवैध कत्तलखाने बंद करण्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या जिल्हा बंदला शहरात सायंकाळी हिंसक वळण लागले. शहरातील एका भागात उसळलेल्या दंगलीचे लोण शहरभर पसरून दगडफेक व जाळपोळ झाली. हिंसाचारात सहा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह दहा जण जखमी झाले. दंगेखोरांनी पोलिसांची दोन वाहने, अग्निशमन दलाचा बंबासह १५ वाहनांचे नुकसान केले. सायंकाळी सहा वाजता शहरात संचारबंदी लागू करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण असून राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या व धुळे येथून अतिरिक्त पोलीस दल मागविण्यात आले आहे. सकाळपासून बंद शांततेत सुरू असताना सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शहरातील पत्राचौकी भागात किरकोळ दगडफेक झाली. मात्र अफवांमुळे जळका बाजार, ईलाही चौक, दोशाह तकीया, बागवान गल्ली या भागात दंगल उसळली. दोन्ही गटांकडून तुफान दगडफेक झाली. दंगलखोरांनी दोन मोटारसायकली जाळल्या. पोलिसांच्या दोन वाहनांसह सहा मोटारसायकलींचे नुकसान केले. दगडफेकीत दोन पोलीस अधिकारी व पाच ते सहा कर्मचारी जखमी झाले. साधारण तासभर दंगलखोरांनी शहराला वेठीस धरले होते. सायंकाळी सहाला शहरात संचारबंदी लागू करण्यात आली. रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू झाले होते. (प्रतिनिधी)च्दंगलखोरांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. दंगलखोरांनी टिळक वाचनालयामागील एका घरात घुसून तोडफोड केली. आग विझविण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या वाहनाचेही नुकसान केले.