शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
4
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
5
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
6
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
7
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
8
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
9
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
10
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
11
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
12
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
13
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
14
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
15
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
16
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
17
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
18
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
19
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
20
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Daily Top 2Weekly Top 5

नाना पटोलेंचा मोठा दावा; म्हणाले, आम्हाला शपथविधीला बोलवले असते तर आलो असतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 13:52 IST

Nana Patole on CM Oath: भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या शपथविधीला उद्धव ठाकरे, शरद पवार यांना बोलविण्यात आले होते. परंतू ते आले नाहीत, यावरून भाजपाने २०१९ ला फडणवीस सगळे विसरून ठाकरेंच्या शपथविधीला आले होते असे म्हणत कोत्या मनाची मानसिकता अशी टीका केली आहे.

भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या शपथविधीला उद्धव ठाकरे, शरद पवार यांना बोलविण्यात आले होते. परंतू ते आले नाहीत, यावरून भाजपाने २०१९ ला फडणवीस सगळे विसरून ठाकरेंच्या शपथविधीला आले होते असे म्हणत कोत्या मनाची मानसिकता अशी टीका केली आहे. यातच आता नाना पटोले यांनी मोठा दावा केला आहे. 

आम्हाला शपथविधीसाठी बोलावलं असतं तर गेलो असतो. निरोप कोणाला दिला याची माहिती नाही. निरोप असता तर गेलो असतो, असे पटोले म्हणाले. तसेच आम्हाला कधीच बोलावले नाही असे सांगत माझे मित्र सीएम झाले त्यांना शुभेच्छा आहेत. आता महाराष्ट्राच्या समस्या दूर व्हाव्यात अशी अपेक्षा आहे, असे पटोले म्हणाले. 

कंत्राटी भरती आम्ही बंद करू, असे फडणवीस म्हणाले होते. आता शिक्षकांची कंत्राटी भरती त्यांनी थांबवावी आणि नियमित शिक्षक भरती करावी. ग्रामीण भागात बस जात नाही. ग्रामीण भागात एसटी सेवा बंद करत आहे का? असा प्रश्न पडला आहे. शेतकऱ्यांची कर्ज माफी करावी, धान, सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. राज्याची कायदा सुव्यवस्था सुधारावी, फडणवीस यांना गृह विभागाचा मोठा अनुभव आहे, गृह विभाग त्यांच्याकडेच राहील अशी आमची अपेक्षा आहे, महाराष्ट्र ड्रग मुक्त करावे, अशी मागणी पटोले यांनी केली. 

शपथविधीची तारीख राज्यपाल जाहीर करतात. मात्र यावेळेला यांनीच घोषणा केली, भाजप आणि त्यांचे सोबती हे संविधानापलीकडचे लोक आहेत असा टोला पटोले यांनी लगावला. महायुतीच्या भांडणात आम्हाला जायचे नाही, महाराष्ट्राच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्या हे आमचे उद्दिष्ट आहे. काहींचे चेहरे हसरे आहेत, काहींचे चेहरे पडले आहेत. ईव्हीएम विरोधातला आवाज जनतेचा आहे, पक्षांचा नाही. आता संपूर्ण देशात ईव्हीएचा घोळ चर्चेचा विषय झाला आहे. मारकरवाडीने सरकारच्या मनात लपलेला मतं चोरणारा डाकू सर्वांसमोर आणला आहे, अशी टीका पटोले यांनी केली. 

काँग्रेस गट नेता, प्रतोद निवडीवर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे आमचे पत्र देणार आहोत. ही आमची परंपरा आहे आणि आता जे सत्तापक्षावर बसले आहे, त्यांचे तरी निर्णय कुठे झाले आहेत? एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे स्वतंत्र पक्ष होते पण त्यांचा निर्णय कुठे झाला आहे, असा सवाल पटोले यांनी केला. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेcongressकाँग्रेसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४