शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शायनिंग

By admin | Updated: June 9, 2014 01:43 IST

मेट्रो, नागनदीचे शुद्धीकरण, मिहान प्रोजेक्ट, व्याघ्र राजधानी, भांडेवाडी प्रकल्प व महामार्गांंंंच्या विकासासाचे ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार झाले असून, काही प्रस्तावांना मंजुरीही मिळाली आहे. येत्या काहीच

गडकरींचा विकास मंत्र : ३१ मार्चची डेडलाईन नागपूर : मेट्रो, नागनदीचे शुद्धीकरण, मिहान प्रोजेक्ट, व्याघ्र राजधानी, भांडेवाडी प्रकल्प व महामार्गांंंंच्या विकासासाचे ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार झाले असून,  काही प्रस्तावांना मंजुरीही मिळाली आहे. येत्या काहीच महिन्यांत प्रत्यक्ष कामांना सुरुवात होईल. उपराजधानीत गत २५ वर्षांंंत जी कामे झाली नाहीत, ती  पुढील ३१ मार्चपर्यंंंंत पूर्ण करून दाखविणार असल्याचा विकास मंत्र केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी व्यक्त केला. टिळक श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने रविवारी पत्रकार भवनात आयोजित वार्तालाप कार्यक्रमात गडकरींनी नागपूर शायनिंगचे ‘ब्ल्यू प्रिंट’ सादर केले.शहराच्या विकासाविषयी बोलताना गडकरी म्हणाले, सखोल अध्ययन करून उपराजधानीच्या    विकासासंबंधीच्या फाईल्स दिल्लीत कुठे अडकल्या  आहेत, याची माहिती घेतली आहे. नागपूर     महानगरपालिकेने नागनदी शुद्धीकरणासाठी तयार केलेल्या १७0 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला पर्यावरण  मंत्रालयाची हिरवी झेंडी मिळाली आहे. येत्या तीन ते चार महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. याशिवाय शहरातील अंबाझरी तलाव, शुक्रवारी तलाव व नाईक तलावाच्या विकासासाठी  तयार करण्यात आलेल्या ५0 कोटींच्या प्रकल्पालाही पर्यटन विकास मंत्रालयाची मंजुरी प्राप्त झाली आहे. त्यामुळे तीही कामे लवकरच सुरू होईल.मिहानला बूस्ट ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मिहानसंबंधी नुकत्याच आठ दिवसांपूर्वी संबंधित विभागाशी चर्चा करून, बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या  असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. परंतु अजूनपर्यंंंंत ती बैठक झालेली नाही. त्यामुळे येत्या १४ जून रोजी बैठक बोलाविण्याचा निर्णय घेण्यात आला  आहे. त्यात मिहानच्या विकासासह इंटरनॅशनल एअरपोर्ट व बोईंग प्रोजेक्टवर सविस्तर चर्चा करून लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येणार  असल्याचे ते म्हणाले. व्याघ्र राजधानीचा प्रस्ताव तयार नागपूरला व्याघ्र राजधानीचा दर्जा मिळावा, यासाठीही प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याचे यावेळी गडकरी यांनी सांगितले. विदर्भात सर्वाधिक  जंगल असून, त्यात शेकडो वाघांचा अधिवास आहे. यातून विदर्भातील पर्यटनाचा मोठय़ा प्रमाणात विकास होऊ शकतो. यासाठी ताडोबा येथे खाजगी  रिसोर्टला मंजुरीसह अधिकाधिक पर्यटकांना जंगलात प्रवेश मिळावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. सिकलसेलसाठी नागपुरात रिसर्च सेंटर सिकलसेल हा फार मोठा गंभीर प्रश्न असून, त्यावर काम करण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले. यातूनच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून  नागपुरात सिकलसेल रिसर्च सेंटरला मंजुरी मिळाली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. सध्या सिकलसेलसंबंधी अनेक समस्या आहेत. मशीन्स बंद  असून, औषधींचा नेहमीच तुटवडा असतो. मेडिकलसाठी निधी येऊनसुद्धा कोणत्याही सुधारणा दिसून येत नाही. त्यासाठीही प्रयत्न करण्याची गरज  असल्याचे त्यांनी सांगितले. मनपाचा १५0 वा उत्सव साजरा करणारमहानगरपालिकेला १५0 वर्षे पूर्ण झाली आहेत, यानिमित्त मोठा महोत्सव साजरा करावा, अशी इच्छा असल्याचे यावेळी गडकरी यांनी सांगितले. या  कार्यक्रमासाठी राष्ट्रपतींना बोलावण्याचा विचार असून, त्यासंबंधी आपण राष्ट्रपतींशी चर्चाही केल्याचे ते म्हणाले. या उत्सवात नागपुरातील ए. बी.  बर्धन व अटलबहादूरसिंग यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचा जाहीर सत्कार करण्याची योजना आहे. मात्र महापौर प्रा. अनिल सोले सध्या निवडणुकीत  व्यस्त असून, या निवडणुका पार पडताच उत्सवाची तयारी सुरू केली जाईल. (प्रतिनिधी)मेट्रोला वेग मेट्रो रेल्वे हा नागपुरातील महत्त्वाचा प्रोजेक्ट असल्याचे यावेळी गडकरी यांनी स्पष्ट करून, या विषयावर अलीकडे शहरी विकास विभागाची बैठक  घेण्यात आली असल्याचे ते म्हणाले. नागपुरातील मेट्रो प्रोजेक्टसाठी एकूण १३ एनओसी घ्यावेीलागत आहे. त्यापैकी काही एनओसी मिळाल्या असून,  इतर येत्या ८ ते १0 दिवसांत मिळण्याची शक्यता आहे. यानंतर हा विषय लगेच मंत्रिमंडळापुढे ठेवून पुढील चार ते सहा महिन्यांत प्रत्यक्ष कामाला  सुरुवात करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे ते म्हणाले.