16 Jan, 26 07:41 PM
Nagpur Election Results 2026 : नागपूर नेहरूनगर झोनमध्ये भाजप आघाडीवर, १६ पैकी ९ जागांवर विजय
महानगरपालिकेच्या निवडणुकीत नेहरूनगर झोनमधील निकाल जाहीर झाले असून या झोनमध्ये भाजपने सर्वाधिक जागांवर विजय मिळवत आघाडी घेतली आहे. एकूण १६ जागांपैकी भाजपने ९ जागांवर विजय, तर एमआयएमने ३, काँग्रेसने २ आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) ने २ जागांवर यश मिळवले आहे.
16 Jan, 26 06:57 PM
Nagpur Municipal Election Result 2026 : 'डेव्हलपमेंट म्हणजे फडणवीस!' - बावनकुळे
महापालिका निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप व महायुतीच्या विजयामागे विकासाचा अजेंडा आणि डबल इंजिन सरकारचा विश्वास असल्याचे ठामपणे सांगितले. "डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे डेव्हलपमेंट हाच आज महाराष्ट्राचा ब्रँड बनला आहे," असे ते म्हणाले.
16 Jan, 26 05:23 PM
Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Result 2026: छत्रपती संभाजीनगरमधील अंतिम निकाल समोर. ५८ जागा जिंकत भाजपानं मिळवलं स्पष्ट बहुमत
छत्रपती संभाजीनगरमधील अंतिम निकाल समोर. ५८ जागा जिंकत भाजपानं मिळवलं स्पष्ट बहुमत. शिंदेसेनेला १२ जागा, तर एमआयएमने जिंकल्या तब्बल ३३ जागा, उद्धवसेना ६ तर काँग्रेस १, सपा १ आणि वंचित ४ जागांवर विजयी
छत्रपती संभाजी नगर अंतिम निकाल
एकूण जागा - ११५
भाजप : ५८
शिंदेसेना : १२
उद्धवसेना: ६
एमआयएम : ३३
काँग्रेस : १
राष्ट्रवादी : ०
राष्ट्रवादी SP : १
वंचित बहुजन आघाडी ४
16 Jan, 26 04:26 PM
Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Result 2026: परवानगी नसताना एमआयएम उमेदवाराची मिरवणूक
Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Result 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये परवानगी नसताना एमआयएम उमेदवाराची मिरवणूक, मिरवणुकीनंतर पोलिसांकडून लाठीमार, गरवारे मतमोजणी केंद्राजवळ पोलिसांकडून लाठीमार
16 Jan, 26 04:21 PM
Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Result 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धवसेनेचे राशिद मामू विजयी
छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धवसेनेचे राशिद मामू विजयी, राशिद मामूंसह उद्धवसेनेचे आणखी ३ नगरसेवकही विजयी
16 Jan, 26 04:10 PM
Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Result 2026: छत्रपती संभाजीनगर - अंबादास दानवे हे स्वत:च्या भावालाही विजयी करू शकले नाहीत, चंद्रकांत खैरे यांची टीका
16 Jan, 26 04:03 PM
Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Result 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमला मोठं यश, आतापर्यंत २४ नगरसेवक विजयी
छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमला मोठं यश, आतापर्यंत २४ नगरसेवक विजयी
16 Jan, 26 03:10 PM
Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Result 2026: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकान निवडणुकीमध्ये भाजपा ५२ तर शिंदेसेना १४ जागांवर आघाडीवर
Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Result 2026: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकान निवडणुकीमध्ये भाजपा ५२, तर शिंदेसेना १४ जागांवर आघाडीवर, तर एमआयएमची २४ जागांवर मुसंडी
छत्रपती संभाजीनगर निकाल अपडेट
भाजप : 52
शिवसेना : 14
शिवसेना UBT : 6
एमआयएम : 24
काँग्रेस : 1
राष्ट्रवादी : 0
राष्ट्रवादी SP : 1
वंचित बहुजन आघाडी 4
इतर 0
16 Jan, 26 02:23 PM
Nashik Municipal Election Result 2026: नाशिक महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 10 मधील भाजपा उमेदवार कलावती सांगळे याचा फेर मतमोजणीसाठीचां अर्ज फेटाळला
16 Jan, 26 02:05 PM
Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Result 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा ३५ तर शिंदेसेना १५ जागांवर आघाडीवर
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये भाजपा ३५ तर शिंदेसेना १५ जागांवर आघाडीवर, तसेच एमआयएमने १६ जागांवर घेतली आघाडी
16 Jan, 26 02:01 PM
Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Result 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ विजयी
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ विजयी झाले आहेत.
16 Jan, 26 01:52 PM
Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Result 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दावने यांचे बंधू राजेंद्र दानवे पराभूत
छत्रपती संभाजीनगर महानगपालिकेच्या मतमोजणीत धक्कादायक निकाल. उद्धवसेनेचे नेते अंबादास दावने यांचे बंधू राजेंद्र दानवे पराभूत
16 Jan, 26 01:48 PM
Nashik Municipal Election Result 2026: नाशिकमध्ये भाजपा ५७ जागांवर तर शिंदेसेनेला ४० जागांवर आघाडी
नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजपाची मुसंडी आतापर्यंत ५७ जागांवर घेतली आघाडी, तर शिंदेसेना ४० जागांवर आघाडीवर. उद्धवसेनेला १२ तर मनसे २ जागांवर आघाडीवर
16 Jan, 26 01:38 PM
नाशिक महानगर पालिका निवडणुकीतील दुसऱ्या फेरीचा निकाल जाहीर
नाशिक महानगर पालिका निवडणुकीतील दुसऱ्या फेरीचा निकाल जाहीर
प्रभाग क्र. दुसरी फेरी
१२ अ
राजेंद्र आहेर भाजप = 2529
डॉ. अभिज्ञा घुगे रा. कॉ. शरद पवार = 374
१२ ब
सीमा रंजन ठाकरे रा. का. अजित पवार = 2787
वैशाली पोतदार उधवसेना = 676
वर्षा येवले भाजप = 2929
१२ क
डॉ. हेमलता पाटील रा. का. शरद पवार = 3499
नुपूर सावजी भाजप = 2643
१२ ड
समीर कांबळे शिंदे सेना= 3692
शिवाजी गांगुर्डे भाजप = 2139
मोहन सुतार उधवसेना = 796
16 Jan, 26 01:24 PM
Nagpur Municipal Election Result 2026: नागपूर महानगरपालिकेमध्ये भाजपा शंभरीपार, काँग्रेसला धक्का
Nagpur Municipal Election Result 2026: नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीच्या आतापर्यंच्या कलांमध्ये भाजपाने शंभरीपार मजल मारली आहे. तर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे
नागपूर मनपा एकूण प्रभाग : 38
एकूण जागा : 143/151
भाजप : 106 आघाडीवर
शिंदेसेना : 01 आघाडीवर
काँग्रेस : 29 आघाडीवर
राष्ट्रवादी ( अजित पवार ) : 01 आघाडीवर
राष्ट्रवादी ( शरद पवार ) : 01
एमआयएम : 04
16 Jan, 26 12:38 PM
Nagpur Municipal Election Result 2026: नागपूर महापालिका : कल
एकूण प्रभाग : ३८
एकूण जागा : १५१
भाजप : १०१ आघाडीवर
शिंदेसेना : ०१ आघाडीवर
काँग्रेस : २५ आघाडीवर
राष्ट्रवादी अजित पवार गट : ०१ आघाडीवर
16 Jan, 26 12:34 PM
Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Result 2026: ६६ जागांवरील कल हाती, भाजपाला २१ जागांवर आघाडी
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या मतमोजणीत आतापर्यंत ११५ पैकी ६६ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. या आकड्यांवरून भाजप २१ जागांवर आघाडीवर असून, सत्तास्थापनेसाठी पक्षाची स्थिती बळकट दिसत आहे. शिंदेसेना १५ जागांवर आघाडीवर आहे. तर उद्धवसेना ६ जागांवर आघाडीवर आहे. एमआयएमने १२ जागांवर आपली ताकद कायम ठेवली आहे. काँग्रेसला ४, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट २, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला १ जागा मिळाली आहे. वंचित बहुजन आघाडीने ४ जागांवर आपली पकड कायम ठेवली आहे, तर इतर उमेदवाराला १ जागा मिळाली आहे.
16 Jan, 26 12:31 PM
Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Result 2026: संजय शिरसाट यांच्या दोन्ही मुलांचा विजय जवळपास निश्चित
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या मतमोजणीत पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कुटुंबाची घोडदौड स्पष्ट दिसून येत आहे. संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाठ प्रभाग क्रमांक २९ मधून विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.
16 Jan, 26 12:03 PM
Nagpur Municipal Election Result 2026: सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाने गाठला बहुमताचा आकडा
भाजप- ७५
शिवसेना- ०३
राष्ट्रवादी- ००
ठाकरे- ००
काँग्रेस- २६
मनसे- ००
शरद पवार गट- ००
इतर- ००
16 Jan, 26 11:58 AM
Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Result 2026: प्रभाग २९ चे कल
सिद्धांत शिरसाट ११९७ शिंदेसेना
भगवान गायकवाड ५९६ भाजप
16 Jan, 26 11:57 AM
Nashik Municipal Election Result 2026: पहिली फेरी प्रभाग : १३ चे कल
अ : रश्मी भोसले(शिंदेसेना) : १२९६ (६०१ मतांनी पुढे )
वत्सला खैरे (काँग्रेस) : ३२६
अदिती पांडे (भाजपा) : ६९५
ब : मयुरी पवार (मनसे) : ६४१
सुवर्णा मोरे (शिंदेसेना) : ८३६
हितेश वाघ (भाजप) : ८७३ (३७ मतांनी पुढे )
क : संजय चव्हाण (उद्धवसेना) : ४७५
दीपक डोके (शिंदेसेना) : ५०८
राहुल शेलार (भाजप) : १०२९ (५२१ मतांनी पुढे )
ड : गणेश मोरे (शिंदेसेना) : १२९६ (539 मतांनी पुढे)
शाहू खैरे(भाजप) : ७५७
जयेश बर्वे (उद्धवसेना) : २४७
16 Jan, 26 11:50 AM
Nashik Municipal Election Result 2026: उद्धवसेनेचे महानगर प्रमुख प्रथमेश गीते आघाडीवर
16 Jan, 26 11:49 AM
Nashik Municipal Election Result 2026: प्रभाग ९ मधून दिनकर पाटील आघाडीवर
16 Jan, 26 11:49 AM
Nashik Municipal Election Result 2026: पहिल्या तीन फेऱ्याअखेर अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे आघाडीवर
16 Jan, 26 11:48 AM
Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Result 2026: पोलिसांकडून मतमोजणी केंद्राबाहेर लाठीचार्ज, संजय शिरसाट आक्रमक
16 Jan, 26 11:42 AM
Nagpur Municipal Election Result 2026: नागपूरमध्ये भाजपाला तब्बल ६५ जागांवर आघाडी
नागपूरमधून मोठी अपडेट येत आहे. सुरुवातीच्या कलांनुसार भाजपाने १५१ जागांपैकी तब्बल ६५ जागांवर आघाडी घेतली आहे.
भाजप- ६५
शिवसेना- ०१
राष्ट्रवादी- ००
ठाकरे- ००
काँग्रेस- २२
मनसे- ००
शरद पवार गट- ००
इतर- ००
16 Jan, 26 11:29 AM
Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Result 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये ३३ जागांचे कल हाती
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या मतमोजणीत सुरुवातीला ३३ जागांचे कल हाती आली असून, भाजपने १२ जागांवर आघाडी घेतली आहे. शिंदेसेना ६ जागांवर, उद्धवसेना ५ जागा, एमआयएमचे ५ उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेसला ३ जागांवर आघाडी मिळाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गट प्रत्येकी १ ठिकाणी आघाडीवर आहे.
16 Jan, 26 11:23 AM
Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Result 2026: संभाजीनगर महापालिकेत शिरसाट कुटुंबाचा दबदबा
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या मतमोजणीत शिरसाट कुटुंबाचा दबदबा जाणवत आहे. हर्षदा शिरसाट प्रभाग १८ मधून आघाडीवर असून, मुलगा सिद्धांत शिरसाट प्रभाग २९ मध्ये पुढे आहे. दोन्ही ठिकाणची आघाडी या प्रभागांमध्ये पक्षासाठी मोठा प्लस पॉइंट ठरत आहे. मतमोजणी सुरू असून, समर्थकांचा उत्साह केंद्रांवर पाहायला मिळत आहे.
16 Jan, 26 11:21 AM
Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Result 2026: मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा मोठा बंदबस्त
छत्रपती संभाजीनगरमधील मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांनी सुरक्षिततेसाठी मोठा बंदोबस्त लावला आहे. तसेच परिसरात ड्रोन कॅमेर्याद्वारे पेट्रोलिंग करत सार्वजनिक घोषणाही केल्या जात आहेत. जेणेकरून मतमोजणी सुरळीत पार पडू शकेल आणि कोणताही गोंधळ टाळता येईल.
16 Jan, 26 11:18 AM
Nashik Municipal Election Result 2026: उद्धवसेना, शिंदेसेनेचे उमेदवार आघाडीवर
नाशिक प्रभाग १६ च्या टपली मतदानात राहुल दिवे अ गटामध्ये २३ मतांचा आघाडीवर उद्धव सेनेचे चंद्रकांत गांगुर्डे यांना १८ क मध्ये शिंदे सेना गटाचे पूजा नवले यांना २२ मते ड गटामध्ये शिंदे सेनेच्या ज्योती जोंधळे ११ मतांसह आघाडीवर
16 Jan, 26 11:07 AM
Nashik Municipal Election Result 2026: नाशिकमध्ये टपाली मतदानाची स्थिती काय?
नाशिक - प्रभाग २० टपाली मतदान
उद्धव सेनेचे
अश्विन पवार १३
गायत्री गाडेकर १७
योगिता गायकवाड १७
हेमंत गायकवाड १९
आघाडीवर
16 Jan, 26 11:03 AM
Nagpur Municipal Election Result 2026: नागपूर येथे भाजपा ३५ जागांवर आघाडीवर, काँग्रेसला किती?
नागपूर मनपा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, पहिल्या तासात जे कल हाती आले, त्यानुसार भाजपाने ३५ जागांवर आघाडी घेतली आहे.
भाजप- ३५
शिवसेना- ०२
राष्ट्रवादी- ००
ठाकरे- ००
काँग्रेस- १५
मनसे- ००
शरद पवार गट- ००
इतर- ००
16 Jan, 26 10:53 AM
Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Result 2026: छत्रपती संभाजीनगरमधील मतमोजणी केंद्रावर प्रचंड गर्दी
छत्रपती संभाजीनगरमधील गरवारे मतदान केंद्रावर गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मोठ्या संख्येने मतदार अचानक पद्धतीने मतदान केंद्रात घुसल्याने परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मतदान केंद्राच्या आत बसण्यासाठी पुरेशी जागा नसल्यामुळे काही उमेदवारांना बाहेर येण्यास भाग पाडले गेले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांकडून गर्दी आवरण्याचे प्रयत्न सुरू होते.
16 Jan, 26 10:44 AM
Nashik Municipal Election Result 2026: नाशिक येथे भाजपाला ५ जागांवर आघाडी
भाजप - ०५
शिंदेसेना - ०२
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट - ०१
उद्धवसेना - ०१
मनसे-०१
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट - ०१
इतर - ०१
16 Jan, 26 10:43 AM
Nashik Municipal Election Result 2026: प्रभाग तेरामध्ये गणेश मोरे पहिल्या फेरीनंतर आघाडीवर, शाहू खैरे पिछाडीवर
16 Jan, 26 10:42 AM
Nashik Municipal Election Result 2026: नाशिक येथे भाजपचे दोन बंडखोर आघाडीवर
नाशिक मनपा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, भाजपाचे दोन बंडखोर आघाडीवर आहेत. मुकेश शहाणे आणि शशिकांत जाधव हे सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवर आहेत.
16 Jan, 26 10:38 AM
Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Result 2026: छत्रपती संभाजीनगर येथे भाजपापेक्षा AIMIM आघाडीवर
छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीचे सुरुवातीचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार, बाकी पक्षांपेक्षा एमआयएम पक्षाने अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. एमआयएमचे उमेदवार ५ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा ४ जागांवर आघाडीवर आहे. शिंदेसेनेने ३ जागांवर आघाडी घेतली असून, उद्धवसेनेला ३ जागांवर आघाडी आहे. तर काँग्रेसचा एक उमेदवार आघाडीवर आहे.
16 Jan, 26 10:29 AM
Nashik Municipal Election Result 2026: नाशिकमध्ये भाजपाला आघाडी
नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीचे कल हाती आले, त्यात भाजपाला एक, तर शिंदेसेनेला एका जागेवर आघाडी मिळाली आहे.
16 Jan, 26 10:28 AM
Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Result 2026: छत्रपती संभाजीनगर येथे एमआयएमची कडवी टक्कर
छत्रपती संभाजीनगर येथे मतमोजणीला सुरुवात झाली असून, AIMIM च्या उमेदवारांनी अनेक जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपा ६ जागांवर आघाडीवर आहे, तर शिंदेसेना ३ जागा, उद्धवसेना ३ जागा आणि काँग्रेसला एका जागावर आघाडी मिळाली आहे.
16 Jan, 26 10:19 AM
Nagpur Municipal Election Result 2026: नागपूरमध्ये भाजपाने खाते उघडले, किती जागांवर आघाडी?
नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे जे कल हाती आले, त्यानुसार, भाजपा ९ जागांवर आघाडीवर असून, काँग्रेसला २ जागांवर आघाडी घेतली आहे.
16 Jan, 26 10:16 AM
Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Result 2026: संभाजीनगरमध्ये सुरुवातीचे कल हाती, कोणत्या पक्षांची आघाडी
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला जे कल हाती आले, त्यानुसार, भाजपा ५ जागांवर आघाडीवर असून, उद्धवसेनेला ३ जागा आणि एमआयएम ५ जागांवर आघाडीवर आहे.
16 Jan, 26 10:10 AM
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून ठिय्या आंदोलन
16 Jan, 26 10:02 AM
राज्यातील २९ महापालिकांच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून पोस्टल मतदान मोजणी केली जात आहे.
16 Jan, 26 10:02 AM
छत्रपती संभाजीनगरमध्ये निकालापूर्वीच राडा, उमेदवारांच्या समर्थकांनी बॅरिकेट्स तोडले
16 Jan, 26 10:01 AM
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नाशिक शहराध्यक्ष गजानन शेलारांचा राजीनामा
16 Jan, 26 09:55 AM
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून थेट लाठीचार्ज
16 Jan, 26 09:51 AM
२०१७ मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेने २९ जागा जिंकल्या होत्या, तर भारतीय जनता पक्षाने २२ ठिकाणी विजय मिळवला होता. एमआयएमने २५ ठिकाणी विजय मिळवला होता.
16 Jan, 26 09:49 AM
राज्यातील २९ महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता काही वेळातच महापालिकेचे निकाल होती येतील.
16 Jan, 26 09:46 AM
छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीपूर्वी मोठा राडा होताना दिसत आहेत.
16 Jan, 26 09:46 AM
नाशिकमध्ये पोलिस आणि उमेदवारांमध्ये बाचाबाची तणावाची स्थिती झाली होती.
16 Jan, 26 09:41 AM
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत यंदा चुरशीची लढाई
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत २०१७ साली शिवसेनेने भाजपाच्या साथीने सत्ता मिळवली होती. शिवसेनेला २९ तर भाजपाला २२ जागा मिळाल्या होत्या. १०५ सदस्य असलेल्या महानगरपालिकेत बहुमताचा आकडा ५३ होता. एमआयएमने २५ जागांवर विजय मिळवला होता. इतर पक्षांना दोन आकडी संख्या गाठता आली नव्हती. यंदा शिवसेनेत फूट पडल्यामुळे निकालातील चूरस वाढली आहे.
16 Jan, 26 09:40 AM
नाशिक महानगरपालिकेसाठी मागील निवडणुकीत ६१ टक्के मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत दुपारी ३.३० पर्यंत ३९.६४ टक्के मतदान झाले. रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते.
16 Jan, 26 09:40 AM
नागपूर महानगरपालिकेसाठी मागील निवडणुकीत ५३.७३ टक्के मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत दुपारी ३.३० पर्यंत ४१.२३ टक्के मतदान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते.
16 Jan, 26 09:39 AM
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी मागील निवडणुकीत ६३ टक्के मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत दुपारी ३.३० पर्यंत ४३.६७ टक्के मतदान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते.
16 Jan, 26 08:54 AM
नाशिकमध्ये काय होणार? राजकीय वर्तुळाचे लागले लक्ष
नाशिकमध्ये भाजपाला ५४ ते ६२ जागा मिळू शकतील. शिंदेसेना ३५ ते ४१ जागांवर विजय मिळू शकेल. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ९ ते १३ जागा मिळू शकतील. उद्धवसेनेला ८ ते ९ जागा मिळू शकतील. तर मनसेला २ ते ३ जागा मिळतील. काँग्रेस १ ते ३ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला एक जागा आणि अपक्ष उमेदवार ७ ते ९ जागांवर विजयी होऊ शकतील, असा कयास आहे.
16 Jan, 26 08:50 AM
नागपूरमध्ये कोणाला किती जागा मिळण्याचा अंदाज
नागपूरमध्ये भाजपा १०९-१२१ जागा जिंकेल, तर शिंदेसेना ६ ते ७ जागा जिंकेल, काँग्रेसला २२ ते ३० जागा मिळू शकतील, तर उद्धवसेनेला १ ते २ जागा मिळतील. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १ ते २ जागा मिळतील, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एखाद्या जागेवर विजय मिळू शकेल. तर अपक्षांना २ ते ४ जागा मिळू शकतील, असा अंदाज आहे.
16 Jan, 26 08:46 AM
विरोधकांना शंका असेल ऑईलपेंटचाच वापर करा
निवडणूक आयोगावर कुठल्याही प्रकारचा संशय घेणे अयोग्य आहे असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना शंका असेल ऑईलपेंटचाच वापर करा, असा चिमटा काढला.
16 Jan, 26 08:45 AM
शिंदे-पवारांवर भाजप भारी
नाशिकमध्ये शिंदेसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने युती केली असली तरी तिथे भाजप सत्ता स्थापन करेल असे एक्झिट पोलवरुन दिसते.
16 Jan, 26 08:45 AM
भाजप राखणार आपला गड
नागपूरमध्ये भाजप गड राखेल असा एक्झिट पोलमध्ये कौल दिसतो. सर्वाधिक जागा त्याही १०० च्या वर घेत भाजप आपली ताकद पुन्हा सिद्ध करेल. काँग्रेस थोडीशी जोर मारेल असे दिसते.
16 Jan, 26 08:44 AM
महापालिकांवर कुणाची सत्ता? निकालात ठरणार...
राठवाड्याचे केंद्र असलेले छत्रपती संभाजीनगरचा कौल कोणाला? द्राक्षनगरी नाशिकची द्राक्षे कोणासाठी आंबट ठरतील आणि कोणासाठी गोड याबद्दल अनेकांची धाकधूक वाढली आहे.
16 Jan, 26 08:44 AM
वाद टाळण्यासाठी आयोगाने 'टक्का' जाहीर करणे टाळले
राज्यातील २९ महापालिकांसाठी दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४१.१३% मतदान झाल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. मात्र त्यानंतरची मतदानाची टक्केवारी जाहीर करणे आयोगाने टाळले आहे. टक्केवारीवरून होणारे वाद टाळण्यासाठी आयोगाने रात्री उशिरापर्यंत मतदानाची अंदाजित टक्केवारीही जाहीर केली नाही.
16 Jan, 26 08:44 AM
मतदानावेळी 'महा' गोंधळ : बोटावरची शाई पुसली गेल्याच्या तक्रारींमुळे वाद
राज्यातील २९ महापालिकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या प्रचंड फैरी झडल्यानंतर मतदारराजाने त्याचा कौल गुरुवारी 'ईव्हीएम'बंद केला. कोणत्या राजकीय पक्षांना आणि नेत्यांना हसण्याची संधी मिळते आणि कोणाला हादरे बसतात याचा फैसला शुक्रवारी सकाळी १० पासून सुरू होणाऱ्या मतमोजणीद्वारे होणार आहे.