शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

संगीत विषयाची शिक्षणक्षेत्रात उपेक्षा होते आहे

By admin | Updated: January 28, 2015 01:08 IST

संगीताचे क्षेत्र फार व्यापक आहे. उदारीकरणाच्या काळात तर संगीताचे विविध जागतिक प्रवाह आणि त्यांची संमिश्रताही अभ्यासण्यासारखी आहे. इतर क्षेत्रांप्रमाणेच संगीत क्षेत्रातही सध्या अनेक

सुप्रसिद्ध पार्श्वगायक शंकर महादेवन यांची खंतनागपूर : संगीताचे क्षेत्र फार व्यापक आहे. उदारीकरणाच्या काळात तर संगीताचे विविध जागतिक प्रवाह आणि त्यांची संमिश्रताही अभ्यासण्यासारखी आहे. इतर क्षेत्रांप्रमाणेच संगीत क्षेत्रातही सध्या अनेक संधी उपलब्ध आहेत आणि संगीतात आपले भविष्य घडविण्याचे पर्यायही उपलब्ध आहेत. पण संगीत या विषयाकडे शिक्षण क्षेत्रात अद्यापही फारसे गांभीर्याने बघितले जात नाही. संगीत हा विषय दुय्यम ठेवला जातो. शिक्षणक्षेत्रात संगीत विषयाची ही उपेक्षा थांबायला हवी, असे मत सुप्रसिद्ध पार्श्वगायक शंकर महादेवन यांनी मंगळवारी व्यक्त केले. दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये सुरू असलेल्या शंकर महादेवन संगीत अकादमीच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक कार्यक्रमासाठी ते स्कूलमध्ये आले होते. याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. शाळा आणि महाविद्यालयात संगीत हा विषय केवळ गुणांशी (मार्क्स) जोडला जातो. त्यामुळे विद्यार्थीही गुण मिळविण्यासाठीचा विषय म्हणून संगीत शिकतात. पण शाळांमध्ये संगीत फारसे गांभीर्याने शिकविले जात नाही. यात नक्कीच काही अपवाद आहेत. हा विषय गुण मिळविण्याचा नाहीच. तो आपल्या व्यक्तिमत्त्वात सुधार आणणारा आणि आपली सृजनशील शक्ती वाढविणारा, आनंद देणारा विषय आहे. त्यामुळे संगीत हा विषय दुय्यम न ठरविता शिक्षणक्षेत्रात गांभीर्याने शिकविला गेला आणि त्यातून विद्यार्थ्यांना आनंद मिळेल, अशी व्यवस्था केली तर अनेक संगीतकार तयार होतील. विद्यार्थ्यांना गंभीरपणे संगीत शिकविले तर त्यातून प्रत्येक विद्यार्थी संगीतकार, गायक होणार नाहीत पण ते ज्या क्षेत्रात जातील, त्या क्षेत्रात अधिक चांगले काम करण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण होईल. ही शक्ती संगीतात आहे. यासाठी संगीत शिकविण्याच्या पद्धतीतही आमूलाग्र बदलाची आवश्यकता असल्याचे मत संगीतकार शंकर महादेवन यांनी व्यक्त केले. मराठी संगीतात सध्या अनेक नवे प्रयोग करण्यात येत आहेत. त्यामुळे मराठी संगीताचा प्रेक्षकही वाढतो आहे. विशेषत: मराठी कवितांचा दर्जा आणि मराठी संगीताची गुणवत्ता राखली जात असल्याने दर्जेदार मराठी संगीत निर्माण होते आहे. त्यामुळेत लोकमान्य टिळक, मितवा, कट्यार काळजात घुसली या मराठी चित्रपटांमध्ये मला गायनाची संधी मिळाली. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटाबद्दल मी ऐकले आहे पण हा चित्रपट अद्याप मी पाहू शकलो नाही. पण त्यांचे कार्य जवळून पाहिले असून त्यांच्याविषयी मला आदर आहे.