शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संगीतकार आनंद मोडक यांचे निधन

By admin | Updated: May 24, 2014 02:51 IST

एक झोका... चुके काळजाचा ठोका’ यासारखी एकाहून एक आठवणीत राहणारी गाणी देणारे जेष्ठ संगीतकार आनंद मोडक (६३) शुक्रवारी चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवून अनंताच्या यात्रेला निघून गेले

पुणे : ‘एक झोका... चुके काळजाचा ठोका’ यासारखी एकाहून एक आठवणीत राहणारी गाणी देणारे जेष्ठ संगीतकार आनंद मोडक (६३) शुक्रवारी चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवून अनंताच्या यात्रेला निघून गेले. त्यांच्या आकस्मिक निधनाने नाट्य, चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. संत गजानन महाराज यांच्यावरील रचना मोडक यांनी अलीकडेच स्वरबद्ध केल्या होत्या. गायक रवींद्र साठे यांच्याबरोबर मोडक यांनी कालपासून त्याचे रेकॉर्डिंग सुरू केले होते. मात्र, आज सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. उपचारांपूर्वीच सकाळी ११च्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुली आहेत. आज संध्याकाळी त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. १३ मे १९५१ रोजी आनंद गोपाळ मोडक यांचा जन्म अकोला येथे झाला. संगीतात प्रावीण्य मिळवण्याचे ध्येय उराशी बाळगून ते पुण्यात आले. थिएटर अ‍ॅकॅडमी या नाट्य संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते. या संस्थेच्या ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकात त्यांनी भूमिकाही केली होती. ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या ‘महानिर्वाण’ या नाटकाला त्यांनी प्रथम संगीत दिले आणि त्यानंतर त्यांना आपल्या आयुष्याचा खरा सूर सापडला. प्रयोगशील संगीतकार म्हणून ओळखले जाणारे मोडक यांनी संगीताचा कोणताही प्रकार वर्ज्य मानला नाही. शब्दप्रधान गायकीला प्राधान्य देणारे संगीतकार म्हणूनही ते ओळखले जात. एकीकडे बँकेत नोकरी करत असताना त्यांनी ‘तीन पैशांचा तमाशा’, ‘पडघम’, ‘विठ्ठला’, ‘अफलातून’, ‘संगीत म्युन्सिपालिटी’ अशा १२ नाटकांना आणि दोन बॅलेना संगीत दिले. ‘बदकाचे गुपित’ हा त्यांनी संगीत दिलेला आणि दिग्दर्शित केलेला ‘आॅपेरा’ हा एक वेगळाच प्रयोग होता. त्यांनी तब्बल ५३ चित्रपटांना संगीत दिले आहे. ‘चौकट राजा’, ‘२२ जून १९८७’, ‘एक होता विदुषक’, ‘हरिश्चंंद्राची फॅक्टरी’ हे त्यातले काही प्रमुख चित्रपट. याशिवाय त्यांनी बा.सी. मर्ढेकर, आरती प्रभू या कवींच्या कवितांवर कार्यक्रम केले, तसेच काही सांगितीक कार्यक्रमही केले. नुकताच प्रदर्शित झालेला ‘यशवंतराव चव्हाण : बखर एका वादळाची’ हा त्यांचा प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट ठरला. याशिवाय ‘एलिझाबेथ’, ‘एकादशी’, ‘रमा माधव’ यांसारखे चार चित्रपट अजून प्रदर्शित व्हायचे आहेत. (प्रतिनिधी)