उल्हासनगरात तरुणाची हत्या, आरोपीला अटक

By Admin | Updated: September 21, 2015 01:25 IST2015-09-21T01:25:05+5:302015-09-21T01:25:05+5:30

गॅरेज व्यवसायातील फसवणुकीच्या रागातून मित्राने अजगर हुसेन अब्दुल खान याचा निर्घृण खून केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

The murder of the youth in Ulhasanagar, the accused arrested | उल्हासनगरात तरुणाची हत्या, आरोपीला अटक

उल्हासनगरात तरुणाची हत्या, आरोपीला अटक

उल्हासनगर : गॅरेज व्यवसायातील फसवणुकीच्या रागातून मित्राने अजगर हुसेन अब्दुल खान याचा निर्घृण खून केल्याचा प्रकार उघड झाला आहे. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी काही तासांत आरोपीला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय सायगावकर यांनी दिली.
कॅम्प नं-३, प्रबुद्धनगरमध्ये एका खोलीत तरुणाचा खून झाल्याची माहिती शनिवारी रात्री पोलिसांना मिळाली. तपासादरम्यान अजगर व राजकुमार झा यांनी गॅरेज व्यवसायात पैसे गुंतविल्याचे उघड झाले. दिलेले पैसे परत देत नसल्याच्या प्रकारातून दोघांत भांडण झाले. याच रागातून झा याने अजगरचा खून केल्याचा संशय पोलिसांना आला. यानंतर, ताब्यात घेतल्यावर त्याने गुन्हा कबूल केला.

Web Title: The murder of the youth in Ulhasanagar, the accused arrested