मुलीची छेड काढल्याने जाब विचारणाऱ्या पित्याची हत्या

By Admin | Updated: October 15, 2016 03:55 IST2016-10-15T03:55:50+5:302016-10-15T03:55:50+5:30

वर्षभरापूर्वी मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला जाब विचारणाऱ्या पित्याची २३ वर्षीय रोडरोमियोने हत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री

Murder victim father | मुलीची छेड काढल्याने जाब विचारणाऱ्या पित्याची हत्या

मुलीची छेड काढल्याने जाब विचारणाऱ्या पित्याची हत्या

मुंबई : वर्षभरापूर्वी मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला जाब विचारणाऱ्या पित्याची २३ वर्षीय रोडरोमियोने हत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री कुर्ल्यात घडली. या प्रकरणी ह्त्येचा गुन्हा दाखल करून कुर्ला पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
लालबहादूर शास्त्री मार्गालगत असलेल्या इंदिरानगर परिसरात राशिद अहमद शेख (४२) हे कुटुंबासोबत राहतात. वर्षभरापूर्वी शेख यांच्या मुलीची मोहम्मद युनूस शेख ऊर्फ बबलू याने छेड काढली होती. शेख यांनी याचा जाब विचारत बबलूला चापट मारली होती. हाच राग मनात धरून असलेल्या बबलू याने गुरुवारी रात्री शेख यांच्यावर चाकूने हल्ला केला. यात शेख यांचा मृत्यू झाला. शेख यांची पत्नी सायरा यांनी दिलेल्या तक्रारीवरून बबलूविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याचे कुर्ला पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Murder victim father