शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

हत्येपूर्वी मारेकरी कपाडियांच्यासमवेत दारु प्याले होते

By admin | Updated: March 10, 2015 04:20 IST

हत्येआधी उच्च न्यायालयाचे निवृत्त प्रधान सचिव डायरस कपाडिया (७८) यांना मारेकऱ्यांनी दारू पाजली होती. ते नशेत तर्र झाल्यानंतर मारेक-यांनी

जयेश शिरसाट, मुंबईहत्येआधी उच्च न्यायालयाचे निवृत्त प्रधान सचिव डायरस कपाडिया (७८) यांना मारेकऱ्यांनी दारू पाजली होती. ते नशेत तर्र झाल्यानंतर मारेकऱ्यांनी त्यांचे अख्खे घर उसकले. आठ लाखांची चोरी केल्यानंतर जाता जाता त्यांची हाताच्या नसा व गळा कापून हत्या केली, अशी धक्कादायक माहिती वांद्रे पोलिसांच्या तपासातून पुढे आली आहे.कपाडीया आणि जय नवरंग यांनी यापूर्वी दोनवेळा एकत्र बसून मद्यपान केले होते. एरव्ही अनोळखी व्यक्तीला दार न उघडणाऱ्या कपाडीयांचा तो चांगल्या परिचयाचा होता. त्याहून महत्वाचे म्हणजे त्याचे वडील हे त्यांचे विश्वासू होते. त्यामुळे हत्येच्या दिवशी रात्री नऊच्या सुमारास दरावर आलेल्या जयला कपाडीया यांनी आत घेतले. त्याच्यासोबत आलेल्या कल्पेशचेही त्यांनी स्वागत केले. जयने आपल्यासोबत व्होडकाच्या पाच क्वार्टर आणल्या होत्या. रात्री साडेदहापर्यंत तिघांनी मिळून त्या रिचवल्या.हत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आठ तासामध्ये २५ संशयीतांची चौकशी करून जय तानाजी नवरंग (२१) आणि कमलेश नारायण जाधव उर्फ मिनी (२२) यांना अटक केली. यापैकी जय हा कपाडीया यांच्या घरी काही महिने घरकाम करत होता. त्याचे रिक्षाचालक वडील तानाजी हे कपाडीया दाम्पत्याचे अत्यंत विश्वासू होते. त्यांना ते मुलासारखे समजत होते. लीली यांना आपल्या पतीची हत्या झाल्याचे समजल्यानंतर पहिला फोन त्यांनी तानाजी यांना केला.तानाजीही त्यांना डॅडी, मम्मी हाक मारत.वांद्रयाच्या पारसी कॉलनीत कपाडीया आणि पत्नी लीली(७४) हे वयोवृद्ध दाम्पत्य वास्तव्यास होते. नेहमीप्रमाणे पत्नी त्यांच्या ५० वर्षीय मुलीच्या घरी गेल्या होत्या. कपाडीया घरी एकटेच होते. त्यामुळे त्यांना मारुन चोरी करणे शक्य असल्याचे जयने कमलेशला सांगितले. त्यानुसार भेटण्याचे निमित्य करुन दोघांनी घरात प्रवेश केला होता, असे वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रामचंद्र ढवळे व निरीक्षक राजेंद्र काणे यांनी सांगितले.