बदलापुरात शिवसेना उपशहरप्रमुखाची हत्या

By Admin | Updated: May 24, 2014 02:47 IST2014-05-24T02:47:09+5:302014-05-24T02:47:09+5:30

शहर शिवसेनेचे उपशहरप्रमुख आणि माजी नगरसेवक मोहन राऊत यांची शुक्रवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या कार्यालयातच दोघा मारेकर्‍यांनी गोळ्या घालून हत्या केली.

The murder of Shiv Sena Deputy Chief | बदलापुरात शिवसेना उपशहरप्रमुखाची हत्या

बदलापुरात शिवसेना उपशहरप्रमुखाची हत्या

बदलापूर : शहर शिवसेनेचे उपशहरप्रमुख आणि माजी नगरसेवक मोहन राऊत यांची शुक्रवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या कार्यालयातच दोघा मारेकर्‍यांनी गोळ्या घालून हत्या केली. हत्येच्या निषेधार्थ बदलापूर शहर बंद ठेवण्यात आले. दोन महिन्यांतील गोळीबाराची ही तिसरी घटना आहे. सूर्यानगर येथील जनसंपर्क कार्यालयात येऊन राऊत यांनी आपली गाडी अंगरक्षकाला आणण्यास बदलापूर स्टेशनला पाठवली. कार्यालयात एकटे असताना दोघांनी त्यांच्यावर सात राउंड फायर करून पळ काढला. पाच गोळ्या त्यांना लागल्या. जखमी राऊत यांना प्रथम शहरातील खासगी रुग्णालयात व नंतर डोंबिवलतील एम्स रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. राऊत गोळीबार प्रकरणातील त्यांचे भाऊ प्रवीण राऊत यांच्या फिर्यादीवरून आमदार किसन कथोरे यांच्यासह योगेश राऊत, जगदीश राऊत, समीर धारवे, रमेश पाटील, पप्पू मोरे आणि देवेंद्र मालुसरे या सात संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The murder of Shiv Sena Deputy Chief