शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

मुरळीवर सक्तीचे मातृत्व !

By admin | Updated: December 26, 2014 02:00 IST

पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्रात अंधश्रद्धेतून देवाशी लग्न लावून मुरळी बनलेल्या १३ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण

अकोले (जि. अहमदनगर) : पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणा-या महाराष्ट्रात अंधश्रद्धेतून देवाशी लग्न लावून मुरळी बनलेल्या १३ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण झाल्याने खेळण्या-बागडण्याच्या वयात तिच्यावर सक्तीचे मातृत्व लादले गेल्याचा धक्कादायक प्रकार येथे उघड झाला आहे. पीडित मुलीला अडीच महिन्यांचे तान्हे बाळ आहे.एका सामाजिक संस्थेने याबाबत पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी मुलीच्या आजीला ताब्यात घेतले आहे. पीडित मुलीचे आई-वडील वीटभट्टीवर रोजंदारी करून त्यांची उपजीविका करतात. या कष्टकरी कुटुंबाला पाच मुली आहेत. मुलीच्या आजीने नवस फेडण्याच्या नावाखाली तिचे खंडोबा देवाशी लग्न लावून तिला मुरळी बनवले. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करणारे हेरंब कुलकर्णी यांनी तिला पाच वेळा वेगवेगळ्या शाळेत दाखल करून शिक्षणाची गोडी लावण्याचा प्रयत्न केला. मुलीला मराठी शाळा तसेच आश्रमशाळेत दाखल करून पाहिले. मात्र त्यांच्या प्रयत्नास यश आले नाही. मुलीच्या आजीने तिला शिकण्यापासून परावृत्त करत जागरण गोंधळाच्या कार्यक्रमास पाठवण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान तिचे लैंगिक शोषण तर झालेच मात्र ही अल्पवयीन मुलगी माता झाली आहे. कुलकर्णी यांच्या हा धक्कादायक प्रकार लक्षात आला. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्ष अ‍ॅड. रंजना गवांदे, राजेंद्र धारणकर यांनी स्पार्क संघटनेच्या मदतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीसांनी पीडित मुलीस व तिच्या आजीस चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. जाबजबाब नोंदविल्यानंतर पोलिसांनी तालुक्यातील वाघ्या-मुरळी यांची चौकशी सुरु केली आहे. पीडित मुलगी व तिच्या बाळास सध्या महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)