शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष कार्यमुक्त!

By admin | Updated: July 5, 2014 23:48 IST

नगरपालिकांच्या अध्यक्षांनी आज ५ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला.

खामगाव: घाटाखालील खामगाव, शेगाव, नांदुरा, मलकापूर आणि जळगाव जामोद नगरपालिकांच्या अध्यक्षांनी आज ५ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. नगर पालिका निवडणुकीसाठी मनुष्यबळ कमी असल्याचे कारण दर्शवून विद्यमान नगराध्यक्षांना शासनाने १0 जून रोजी ६ महिन्यांची मुदतवाढ दिली होती. या निर्णयाविरोधात काही नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. दरम्यान, मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुदतवाढीचा निर्णय रद्द झाल्याने आज शनिवारी ५ जुलै रोजी निवडणूक लावण्याची प्रक्रीया शासनाने हाती घेतली असून जिल्हाधिकार्‍यांच्या विशेष आदेशानुसार घाटाखालील पाचही नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा पदभार उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी स्विकारला आहे. खामगाव नगर पालिकेचे अध्यक्ष गणेश माने, उपाध्यक्ष संतोष देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे यांच्याकडे सुपूर्द केला. येथील नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा प्रभार उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे यांनी घेतला आहे. त्याचप्रमाणे शेगाव नगर पालिकेचे अध्यक्ष शिवाजीराव बुरूंगले यांनी दुपारी १ वाजता तर उपाध्यक्ष रविंद्र रायणे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. येथील नगराध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचा प्रभार तहसीलदार डॉ. रामेश्‍वर पुरी सांभाळणार आहेत. नांदुरा नगर पालिकेच्या विद्यमान नगराध्यक्षा सौ. सुशिलाताई नांदुरकर, उपाध्यक्ष नवृत्ती इंगळे यांनी नायब तहसीलदार शेलार यांच्याकडे राजीनामा दिला. नांदुरा येथील नगराध्यक्ष, उपाध्यक्षांचा प्रभार नायब तहसीलदार शेलार यांच्याकडे राहणार आहे. तसेच जळगाव जामोद नगर पालिकेच्या अध्यक्षा सौ. स्वातीताई वाकेकर, उपाध्यक्ष तुकाराम काळपांडे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांचा प्रभार तहसीलदार चव्हाण यांनी सांभाळला. यावेळी संबंधित नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच विविध पक्षाचे राजकीय नेते, नगरसेवक उपस्थित होते

** मलकापूर नगराध्यक्षांचा राजीनाम्यास खो

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाची राजीनाम्यासंदर्भातील माहिती मलकापूर नगराध्यक्षांकडे दिल्यानंतरही हाजी रशीद खान जमादार यांनी स्वत:हून राजीनामा सादर केला नाही. त्यामुळे त्यांच्या पदाचा प्रभार उपविभागीय अधिकारी दिनेशचंद्र वानखडे यांना एकतर्फी घ्यावा लागला. उपाध्यक्ष अँड. गजानन सोमण यांनी राजीनामा सादर केल्यानंतर उपविभागीय अधिकार्‍यांनीही उपाध्यक्षपदाचा प्रभार स्विकारला.

** पदावरून पायउतार झाल्यानंतर केले भूमिपूजन!

खामगाव नगर पालिकेचे नगराध्यक्ष गणेश माने यांनी राजीनामा सादर केल्यानंतर महाराष्ट्र पर्यटन विकास योजनेअंतर्गत जनुना तलाव विकसीत करण्याच्या कामाचे तसेच महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान अंतर्गत घाटपुरी नाका रस्ता कामाचे भुमिपूजन केल्याचा आरोप काँग्रेसच्या नगरसेविकांनी केला आहे. काँग्रेस नगरसेवकांच्या या आरोपांमुळे सत्ताधारी आघाडीत खळबळ उडाली होती.