महापालिकेचे दोनच स्विमिंग पूल हायकोर्टाच्या कानपिचक्या

By Admin | Updated: June 22, 2015 03:06 IST2015-06-22T03:06:42+5:302015-06-22T03:06:42+5:30

एका लहान राज्याचे बजेट असणाऱ्या महापालिकेचे मुंबईत केवळ दोनच स्विमिंग पूल असल्याबद्दल उच्च न्यायालयाने पालिकेला कानपिचक्या दिल्या.

The Municipal Corporation's two swimming pools are located in the High Court | महापालिकेचे दोनच स्विमिंग पूल हायकोर्टाच्या कानपिचक्या

महापालिकेचे दोनच स्विमिंग पूल हायकोर्टाच्या कानपिचक्या

अमर मोहिते, मुंबई
एका लहान राज्याचे बजेट असणाऱ्या महापालिकेचे मुंबईत केवळ दोनच स्विमिंग पूल असल्याबद्दल उच्च न्यायालयाने पालिकेला कानपिचक्या दिल्या. सध्या मुंबईत मोकळे भूखंड कमी आहेत. उद्याने व स्विमिंग पूलची संख्या अत्यल्प आहे. पालिकेचे तर केवळ दोनच स्विमिंग पूल आहे. मुंबईत सार्वजनिक उद्याने मोजकीच आहेत. या उद्यानांची देखभाल करायची सोडून, पालिका सतत वीज बिले पाठवत आहे, असे खडे बोलही न्यायालयाने सुनावले आहेत.
कफ परेड रेसिडेंट असोसिएशनतर्फे एक उद्यान देखभालीसाठी घेण्यात आले आहे.बेस्टने असोसिएशनला २००७ पासूनचे सुमारे पंधरा लाखांचे वीज बील पाठवले आहे. या संदर्भात असोसिएशनने उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली. या उद्यानाचा वीज पुरवठा पूर्ववत करावा व याचिकाकर्त्यांनी गेल्या दोन वर्षांचे वीज बिल भरावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Web Title: The Municipal Corporation's two swimming pools are located in the High Court