शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या मुलीचा चेन्नईत ‘हृदय’पालट

By admin | Updated: June 18, 2014 04:34 IST

डॉक्टरांच्या शल्यकौशल्यास चेन्नई पोलिसांच्या अनोख्या दिलदारपणाची जोड मिळाल्याने हृदयविकाराने त्रस्त मुंबईतील एका तरुणीला सोमवारी जणू पुनर्जन्म मिळाला.

मुंबई : डॉक्टरांच्या शल्यकौशल्यास चेन्नई पोलिसांच्या अनोख्या दिलदारपणाची जोड मिळाल्याने हृदयविकाराने त्रस्त मुंबईतील एका तरुणीला सोमवारी जणू पुनर्जन्म मिळाला. या तरुणीवर प्रत्यारोपणासाठी लवकरात लवकर हृदय उपलब्ध व्हावे, यासाठी चेन्नई वाहतूक पोलिसांनी ‘ग्रीन कॉरिडॉर’ अमलात आणून शहराच्या १५ किमी रस्त्यावरील वाहतूक रोखून ठेवली. त्यामुळे ‘ह्रदय’ घेऊन निघालेल्या गाडीला हे अंतर १० मिनिटांत कापणे शक्य झाले.गेली चार वर्षे हृदयविकाराने त्रस्त असणाऱ्या २१ वर्षीय व्हॉवी मिनोचर्चाेमजी हिच्यावर सोमवारी चेन्नईमध्ये हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. मृत व्यक्तीच्या शरीरातून हृदय काढल्यावर पुढच्या चार तासांमध्ये हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होणे गरजेचे असते. चेन्नईचे सरकारी रुग्णालय आणि ज्या रुग्णालयात प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली, यामधले अंतर सुमारे १५ किमी इतके आहे. मात्र शस्त्रक्रियेसाठी लवकरात लवकर हृदय पोहचावे म्हणून चेन्नईमध्ये ‘ग्रीन कॉरिडोर’ निर्माण केला होता. सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक) यांच्याकडून परवानगी घेऊन रस्त्यावरील सर्व सिग्नल हिरवे करण्यात आले होते. या रस्त्यावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. यामुळे हृदय सरकारी रुग्णालयातून खासगी रुग्णालयात केवळ १० मिनीटांत घेऊन येणे शक्य झाले. वांद्रे येथील व्हॉवी याच वर्षी बी.कॉम उत्तीर्ण झाली. ती तीन ते सहा महिन्यांपेक्षा जास्त जगू शकणार नाही, असे डॉक्टरांनी तिच्या पालकांना सांगितले होते. तिच्यावर उपचार करून तिला बरे करायचेच, असा निश्चिय तिच्या पालकांनी केला. म्हणून हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी ते तिला अमेरिकेमध्ये घेऊन जाणार होते. मात्र तिथे दोन वर्षांची प्रतीक्षा यादी असल्यामुळे तिथे घेऊन जाणे त्यांनी रद्द केले. मग तिला दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी चेन्नईच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल केले होते. (प्रतिनिधी)