शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील ६००० सीसीटीव्हींचे टेंडर आज उघडणार

By admin | Updated: September 24, 2014 05:33 IST

मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शहरात ५००० क्लोज सर्किट टीव्ही (सीसीटीव्ही) बसवण्याची जी योजना होती तिला अखेर मूर्त स्वरूप मिळण्याची चिन्हे आहेत

डिप्पी वांकाणी, मुंबईमुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शहरात ५००० क्लोज सर्किट टीव्ही (सीसीटीव्ही) बसवण्याची जी योजना होती तिला अखेर मूर्त स्वरूप मिळण्याची चिन्हे आहेत. गृह खात्याकडे आलेल्या विविध देकारांमधून लार्सन अँड टुब्रो कंपनी आणि ट्रायमॅक्स या दोन कंपन्या पात्र ठरल्या असून, त्यापैकी कोणत्या कंपनीची निवड करायची यासाठी बुधवारी निविदा उघडण्यात येतील. मूळ योजनेत बदल करून सीसीटीव्हींची संख्या आता ६००० करण्यात आली आहे. मूळ योजनेत ५००० ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचा प्रस्ताव होता. आता काही नवी संवेदनशील ठिकाणे लक्षात आली आहेत. त्यानुसार ही संख्या वाढविली आहे, असे सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. निर्णयप्रक्रियेत इतका विलंब का झाला याबाबत सूत्रांनी सांगितले, या प्रकरणी अनेक अडचणी आल्या. इच्छुक कंपन्यांपैकी फारच कमी कंपन्यांकडे योजना राबवण्याची तांत्रिक क्षमता होती. ज्यांच्याकडे तांत्रिक क्षमता होती त्यांची आर्थिक कुवत नव्हती. अभियंते आणि तंत्रज्ञांच्या एका गटाने योजनेत रस दाखवला होता. पण ते जेव्हा बँकांकडे गेले तेव्हा बँकांनी त्यांना अर्थसहाय देण्यास नकार दिला. वायरलेस तंत्रज्ञान पुरवणाऱ्या कंपन्यांच्या लॉबीनेही यात रस घेतल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. वायर्ड तंत्रज्ञानावर एमटीएनएलची मक्तेदारी आहे. ती मोडण्यासाठी वायरलेस उत्पादने पुरवण्याची तयारी दाखवली. पण आम्ही जगभरातील यंत्रणांचा अभ्यास केल्यावर असे दिसून आले की कोठेच सीसीटीव्हींसाठी वायरलेस तंत्रज्ञानाचा वापर केलेला नाही. ही यंत्रणा हॅक करता येत असल्याने त्यात सुरक्षेला बाधा पोहोचू शकते. त्यामुळे अनेक कंपन्यांचे योजनेतील स्वारस्य संपले आणि त्यांनी निविदा प्रक्रियेतून माघार घेतली. (प्रतिनिधी)