शहरं
Join us  
Trending Stories
1
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
2
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
3
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
4
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
5
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
6
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
7
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
8
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
9
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
10
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
11
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
12
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
13
श्रीराम मंदिर, ऑपरेशन सिंदूर आणि नक्षलवाद..; दिवाळीनिमित्त पीएम मोदींचे देशाला पत्र
14
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
15
Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला नवर्‍याने बायकोला ओवाळणी देणे, हा हक्क की कर्तव्य?
16
पुन्हा एकदा सीमापार स्ट्राईक! जोरदार ड्रोन हल्ला; भारतविरोधी 'मेजर जनरल' मारला गेला?
17
Diwali Car Offers: सर्वात कमी डाऊन पेमेंट भरुन व्हा टाटा पंच ईव्हीचे मालक, 'इतका' असेल ईएमआय!
18
Asrani Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले असरानी? जाणून घ्या शिक्षण आणि नेटवर्थ
19
Diwali Bonus: बोनस कमी दिला म्हणून कर्मचाऱ्यांनी केलं असं काही, काही तासांतच कंपनीचं लाखोंचं नुकसान

कुंभमेळ्याहून मुंबईत परतणाऱ्यांना क्वारंटाइन करणार: किशोरी पेडणेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 14:15 IST

kumbh mela: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देमहापौर किशोरी पेडणेकर यांचा महत्त्वाचा निर्णयकुंभमेळ्याहून मुंबई परतणाऱ्यांना क्वारंटाइन करण्याचा विचार५ टक्के लोकांमुळे अनेकांना त्रास - महापौर

मुंबई: महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचा कहर कायम असल्याचे चित्र आहे. कोरोनाची परिस्थिती भयावह झाली असून, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. कोरोनाची गंभीर स्थिती असतानाही हरिद्वार येथील कुंभमेळ्यात लाखो भाविकांनी हजेरी लावली असून, कुंभमेळ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्यामहापौरकिशोरी पेडणेकर यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कुंभमेळ्याहून मुंबईत परतणाऱ्या भाविकांना क्वारंटाइन केले जाईल, अशी माहिती महापौरांनी दिली. (mumbai mayor kishori pednekar says those returning from kumbh mela we are thinking of putting them under quarantine)

राज्यासह मुंबईतही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अनेक रुग्णालयात ऑक्सिजनचा साठाही अपुरा असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. कुंभमेळ्यातून भाविक मुंबईत परत आल्यावर कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर किशोरी पेडणेकर यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत. 

मुंबई परतल्यावर क्वारंटाइन करण्याचा विचार

कुंभमेळ्याहून परतणारे भाविक 'प्रसाद' म्हणून कोरोना घेऊन येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाविकांनी आपापल्या राज्यात स्वखर्चाने क्वारंटाईन व्हावे. मात्र, जे भाविक मुंबईत परततील, त्यांना क्वारंटाइन करण्याचा विचार आम्ही करत आहोत, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.

“आतातरी शहाणे व्हा, चितेत राजकारण जाळून टाका”; संजय राऊतांचे आवाहन

५ टक्के लोकांमुळे अनेकांना त्रास

जवळपास ९५ टक्के मुंबईकर कोरोना नियमांचे पालन करत आहेत. मात्र, ५ टक्के नागरिक नियमांचे उल्लंघन करतात. या लोकांमुळे इतर लोकांनाही त्रास होण्याची शक्यता असते.  सध्याची परिस्थिती पाहता संपूर्ण लॉकडाऊन हाच प्रभावी उपाय ठरु शकतो, असे पेडणेकर यांनी यावेळी नमूद केले. 

“खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे”: जितेंद्र आव्हाड

कोरोनाचा संसर्ग अधिकच झपाट्याने

शुक्रवारी दिवसभरात राज्यात ६३ हजार ७२९ करोनाबाधित वाढले असून, ३९८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातीलर मृत्यू दर १.६१ टक्के आहे. राज्यात आजपर्यंत ५९ हजार ५५१ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. ४५ हजार ३३५ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३०,०४,३९१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.१२ टक्के एवढे झाले आहे.

निवडणुकांमध्ये कोरोनाची ‘रॅली’; बंगालमध्ये ४२० टक्के, तर आसामामध्ये ५३२ टक्के रुग्णवाढ

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ एप्रिल रात्री ८ वाजेपासून पुढचे १५ दिवस राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये पूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली असून फक्त जीवनावश्यक वस्तू आणि सेवांशी संबंधित व्यक्तींना प्रवासाची आणि उद्योगांना सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच, विविध समाजघटकांसाठी अर्थसहाय्य करण्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसKumbh Melaकुंभ मेळाMumbaiमुंबईMayorमहापौरKishori Pednekarकिशोरी पेडणेकरPoliticsराजकारण