शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई शहर, ठाण्याचे पालकमंंत्रीपद सेनेकडे!

By admin | Updated: December 25, 2014 01:59 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्र्यांची यादी तयार केल्याचे समजते. मुंबई शहर, ठाणे, परभणी, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद शिवसेनेकडे

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्र्यांची यादी तयार केल्याचे समजते. मुंबई शहर, ठाणे, परभणी, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद शिवसेनेकडे तर मुंबई उपनगर, रायगड, पुणे, जळगाव व नाशिक या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद भाजपाकडे सोपवण्याचे जवळपास निश्चित झाल्याचे समजते. येत्या दोन दिवसांत पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.पालकमंत्रीपदावरून भाजपा-शिवसेनेत तसेच दोन्ही पक्षांतर्गत रस्सीखेच सुरू होती. मुंबई उपनगरचे पालकमंत्रीपद शिवसेनेला सुभाष देसाई यांच्याकरिता हवे होते. मात्र त्याला भाजपाचा विरोध होता. अखेरीस शिवसेनेला मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आल्याचे कळते. शिवसेनेचा मुंबई उपनगर जिल्ह्यावरील दावा कमकुवत करण्याकरिता ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर भाजपा दावा करणार होते. त्यामुळे शिवसेनेत नाराजी होती.शिवसेनेला विदर्भातील यवतमाळ व अन्य काही जिल्ह्यांची पालकमंत्रीपदे हवी आहेत. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून मुख्यमंत्री यादी अंतिम करणार असल्याचे कळते. शिवसेनेत रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद रामदास कदम यांना मिळू नये याकरिता केंद्रीय मंत्री अनंत गिते व उद्योगमंत्री सुभाष देसाई हे प्रयत्नशील असल्याची चर्चा होती. काही मंत्र्यांना सध्या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद दिले जाणार असून भविष्यात मंत्र्यांची संख्या वाढल्यावर त्यांना त्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद दिले जाईल, असे सांगण्यात येत आहे. (विशेष प्रतिनिधी)