महाराष्ट्रात महामार्गांपेक्षा शहरी, ग्रामीण रस्त्यांवर सर्वाधिक अपघात¨ बळी जाणा-यांचे प्रमाणही चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 07:27 PM2020-01-25T19:27:35+5:302020-01-25T19:31:25+5:30

महाराष्ट्रात जानेवारी २0१६ ते एप्रिल २0१९ या कालावधित एकूण ३९ हजार ४९५ अपघातात ५२ हजार ५६५ लोकांना जीव गमवावा लागला. यात पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण ७५ टक्के, तर महिलांच्या मृत्यूचे प्रमाण २५ टक्के इतके आहे. दरवर्षी राज्यात होणा-या अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे.

Most accidents on urban, rural roads than highways | महाराष्ट्रात महामार्गांपेक्षा शहरी, ग्रामीण रस्त्यांवर सर्वाधिक अपघात¨ बळी जाणा-यांचे प्रमाणही चिंताजनक

महाराष्ट्रात महामार्गांपेक्षा शहरी, ग्रामीण रस्त्यांवर सर्वाधिक अपघात¨ बळी जाणा-यांचे प्रमाणही चिंताजनक

googlenewsNext
ठळक मुद्दे मात्र ज्याठिकाणी वेगाची मर्यादा घातली आहे, अशा स्थानिक मार्गांवरील अपघातांचे व त्यात बळी जाणा-यांचे प्रमाणही चिंताजनक आहे.आॅनलाईन विशेष न्यूज

अविनाश कोळी


सांगली : एक्स्प्रेस वे, राष्ट्रीय व राज्य महामार्गांपेक्षा जिल्हा व ग्रामीण मार्गांवरील अपघातांचे व त्यातील मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे.महाराष्ट् राज्य महामार्ग पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, दरवर्षी महाराष्ट्रातील जिल्हा व अन्य मार्गांवरील अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्या ५ हजारावर आहे. त्यामुळे महामार्गांपेक्षा अन्य मार्ग अधिक धोकादायक बनल्याचे दिसून येते.

महाराष्ट्रातील रस्तेनिहाय अपघातांच्या २0१६ ते २0१८ या तीन वर्षातील आकडेवारीचा अभ्यास केला, तर एक्स्प्रेस वेवरील अपघातात सरासरी ९५, राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात ३ हजार ३00, तर राज्य महामार्गावरील अपघातात ३ हजार २00 लोकांचा बळी जात आहे. तुलनेत अन्य मार्गांवर म्हणजेच जिल्हा, शहरी व ग्रामीण मार्गांवरील अपघातात बळी जाणाऱ्यांचे सरासरी वार्षिक प्रमाण ५ हजार ३00 च्या आसपास आहे. महामार्गांवरील वाहनांची गती अधिक असते, म्हणून याठिकाणीच अधिक अपघात होत असतात, असे सर्रास म्हटले जाते. मात्र ज्याठिकाणी वेगाची मर्यादा घातली आहे, अशा स्थानिक मार्गांवरील अपघातांचे व त्यात बळी जाणा-यांचे प्रमाणही चिंताजनक आहे.

महाराष्ट्रात जानेवारी २0१६ ते एप्रिल २0१९ या कालावधित एकूण ३९ हजार ४९५ अपघातात ५२ हजार ५६५ लोकांना जीव गमवावा लागला. यात पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण ७५ टक्के, तर महिलांच्या मृत्यूचे प्रमाण २५ टक्के इतके आहे. दरवर्षी राज्यात होणा-या अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. गंभीररित्या जखमी व किरकोळ दुखापत झालेल्या अपघातग्रस्तांची संख्या पाहिल्यानंतरही, त्यात जिल्हा, शहरी व ग्रामीण भागातील अपघातांचा प्रथम क्रमांक लागतो. राष्ट्रीय व राज्य महामार्गांपेक्षा अन्य मार्गांवरील जखमींची संख्या जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे अन्य मार्ग सर्वाधिक धोकादायक बनले आहेत.

  • रस्तेनिहाय राज्यातील अपघातांचे प्रमाण...
  • वर्ष मार्ग प्रकार अपघात मृत्यू गंभीर जखमी किरकोळ जखमी
  • २0१६ एक्स्प्रेस वे २८१ १५१ १५३ २६
  • राष्ट्रीय महामार्ग १0,0८३ ३७३६ ५६६६ ३६७0
  • राज्य महामार्ग ९0५२ ३६३६ ५३८१ २८२६
  • अन्य मार्ग २0,४६२ ५४१२ ११0७३ ७0८९
  • वर्ष मार्ग प्रकार अपघात मृत्यू गंभीर जखमी किरकोळ जखमी
  • २0१७ एक्स्प्रेस वे ३६0 १0५ १४७ ४४
  • राष्ट्रीय महामार्ग ८८७७ ३५३२ ५३0५ २८५५
  • राज्य महामार्ग ८५0८ ३६२२ ५१९८ २५७६
  • अन्य मार्ग १८१0८ ५00५ ९८१५ ६१८८
  • वर्ष मार्ग प्रकार अपघात मृत्यू गंभीर जखमी किरकोळ जखमी
  • २0१८ एक्स्प्रेस वे ३५९ ११४ १७४ ३१
  • राष्ट्रीय महामार्ग ८९९६ ३९७४ ५३१३ २९३९
  • राज्य महामार्ग ७७५५ ३४४६ ४६१५ २४१३
  • अन्य मार्ग १८६0७ ५७२७ १0२३३ ५६४७
  • २०१९ ची आकडेवारीही अधिक

 

जानेवारी ते एप्रिल २०१९ या चार महिन्यांच्या कालावधित ११ हजार ८७० अपघातांची नोंद झाली असून, त्यात बळी जाणा-यांची संख्या ४५२० इतकी आहे. या आकडेवारीतही महामार्गांपेक्षा अन्य मार्गांवरील मृत्यू व गंभीररित्या जखमी होणा-यांचे प्रमाण अधिक आहे. चार महिन्यांची ही आकडेवारी मागील तीन वर्षांच्या सरासरीइतकीच आहे.
कारणांचा शोध घ्यायला हवा

 

महामार्गांवरील अपघातांबरोबरच अन्य मार्गांवरील अपघातांची संख्या का वाढत आहे, त्याची कारणे काय आहेत, याचा शोध घेणे गरजेचे आहे. कारणांचा शोध घेतल्याशिवाय उपाययोजनांचा आराखडा तयार करता येणार नाही. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना असल्या तरी, घटनांची कारणमीमांसा प्रथम होण्याची गरज आहे.

 


 


 


 

Web Title: Most accidents on urban, rural roads than highways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.