शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

एसटीकडून ३,३१२ जादा बसेस

By admin | Updated: July 15, 2015 23:59 IST

येत्या २७ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाने जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : येत्या २७ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाने जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण ३ हजार ३१२ जादा बसेसचे नियोजन एसटीकडून करण्यात आले असून त्याशिवाय वैद्यकीय मदत केंद्र, प्रसाधनगृह अशा सेवाही पुरवण्यात येणार आहेत. एसटी महामंडळातर्फे अमरावती येथून ४५२, औरंगाबाद येथून ९५८, नागपूरमधून ५६, पुणेमधून ९७५, नाशिक येथून ७५५ आणि मुंबईतून ११६ बसेस सोडल्या जाणार आहेत. पंढरपूर येथील चंद्रभागा यात्रा बस स्थानकाशिवाय देगांव फाटा येथील विठ्ठल सहकारी सूत गिरणीच्या २५ एकर जागेत नवीन ‘भीमा यात्रा स्थानक’ उभारण्यात आल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. तसेच भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी पंढरपूर मुख्य बस स्थानक, चंद्रभागा आणि भीमा यात्रा स्थानकांवर माहिती तसेच प्रवासी मार्गदर्शक कक्ष उघडण्यात आले आहेत. स्थानक परिसरात भाविकांसाठी वैद्यकीय मदत केंद्र, उपहारगृहे, विश्रांती कक्ष, प्रसाधन गृह, झुणका-भाकर स्टॉल, पिण्याचे पाणी तसेच अखंड वीज पुरवण्यासाठी जनरेटरची व्यवस्था करण्यात आल्याचे एसटी महामंडळाचे साहाय्यक जनसंपर्क अधिकारी मुकुंद धस यांनी सांगितले. या गाड्यांच्या आरक्षणासाठी आॅनलाइन आरक्षण सेवा उपलब्ध असून, एसटीच्या संकेतस्थळाद्वारे अथवा आरक्षण केंद्रांद्वारे भाविक या सेवेचा लाभ घेऊ शकतात, असेही धस म्हणाले. यात्रा संपल्यावर पंढरपूर येथून आळंदी, देहू, तुळजापूर, शिखर शिंगणापूर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी जादा बसेसची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मागील वर्षी या यात्रेसाठी एसटीने ३ हजार १४३ जादा बस सोडल्या होत्या. या गाड्यांच्या २२ हजार २३५ फेऱ्यांद्वारे १३ कोटी ६३ लाख रुपये उत्पन्न एसटीने मिळवले होते.