राज्यात मान्सून सुसाट

By Admin | Updated: June 22, 2015 02:37 IST2015-06-22T02:37:57+5:302015-06-22T02:37:57+5:30

गेले काही दिवस पावसाची वाट पहात असलेल्या पश्चिम महाराष्ट्रासह रविवारी राज्यात सर्वदूर पाऊस झाला. मान्सूनने आगेकूच सुरूच ठेवली

Monsoon suasat in the state | राज्यात मान्सून सुसाट

राज्यात मान्सून सुसाट

मुंबई : गेले काही दिवस पावसाची वाट पहात असलेल्या पश्चिम महाराष्ट्रासह रविवारी राज्यात सर्वदूर पाऊस झाला. मान्सूनने आगेकूच सुरूच ठेवली असून येत्या २४ तासांत विदर्भात अतिवृष्टी होईल, असा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे़
मुंबईसह विदर्भ, मराठवाड्यात गेले दोन दिवस पाऊस धुमाकूळ घालत असला तरी पश्चिम महाराष्ट्र मात्र पावसाची चातकाप्रमाणे वाट पहात होता़ शनिवारी मध्यरात्रीनंतर पुण्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली़ सांगली, सातारा, कोल्हापूरमध्येही रविवारी पाऊस झाला. दक्षिणेत दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती़
रविवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासांत राज्यात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाला.

Web Title: Monsoon suasat in the state