शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईबाबत मुख्यमंत्र्यांवर पंतप्रधान मोदींची नाराजी

By admin | Updated: December 20, 2014 03:08 IST

मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

अतुल कुलकर्णी, नागपूरमुंबईच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानावर मोदींनी मुख्यमंत्र्यांकडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केल्याचे समजते. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मोदींना पाठवलेल्या पत्रानंतर ही नाराजी व्यक्त झाली आहे.मुंबईच्या एकात्मिक विकासासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्याची शिफारस आपण केंद्र सरकारकडे केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागील दिल्ली भेटीनंतर पत्रकारांना दिली होती. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेला राजकीय आणि सामाजिक स्तरांतून तीव्र विरोध झाला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली. त्या पत्रात पवारांनी अनेक घटनात्मक मुद्दे उपस्थित करीत राज्य सरकार मुंबईचा विकास करू शकत नाही का, असा चिमटाही काढला होता. पवारांचे ते पत्र माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री व्यंकया नायडू, नितीन गडकरी, गृहमंत्री राजनाथसिंह, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आदींसह अनेक प्रमुख मंत्र्यांपर्यंत पोहोचविले.