शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 08:27 IST

Mihir Kotecha Latest News: मुंबई पोलीस आणि निवडणूक अधिकारी यांचे पथक राड्याच्या ठिकाणी दाखल झाले होते. मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयात पैशांचे वाटप केले जात होते, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

मुंबईत कालचा दिवस खूप हायटेंशनचा गेला आहे. एकीकडे महायुतीची राज ठाकरे आणि मोदींची सभा आणि दुसरीकडे महाविकास आघाडीची सभा यामुळे सहाही मतदारसंघातील राजकीय वातावरण तापलेले होते. अशातच मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाची ठाकरे गटाने तोडफोड केल्याने तणावात आणखी भर पडली आहे. 

मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयात पैशांचे वाटप केले जात होते, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तर कोटेचा यांनी तुमचे काळे धंदे बंद करणार, असा इशारा दिला आहे. याचे पडसाद आजही उमटण्याची चिन्हे असून महायुतीची सभा संपताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने कोटेचा यांच्या कार्यालयाकडे धाव घेत भेट दिली आहे. याबाबतचे वृत्त टीव्ही ९ ने दिले आहे.

शुक्रवारी रात्री ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील आणि मिहीर कोटेचा यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. ठाकरे गटाने कोटेचा पैशांचे वाटप करत असल्याचे आरोप करत आंदोलन सुरु केले. यात कोटेचा यांच्या कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची झाली त्याचे पर्यावसान जोरदार राड्यामध्ये झाले व ठाकरे गटाने कोटेच्या यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड केल्याचे वृत्त आहे. भाजपच्या वॉर रुममध्ये पैसे मोजण्याचे आणि वाटण्याचे काम सुरु असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला होता. घटनास्थळी मुंबई पोलिसांनी धाव घेऊन सौम्य लाठीचार्ज केला. या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

मुंबई पोलीस आणि निवडणूक अधिकारी यांचे पथक राड्याच्या ठिकाणी दाखल झाले होते. 

मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयात पैसे वाटप केले जात होते. आमच्या लोकांनी पोलिसांना बोलावले मात्र पोलीस आले नाहीत.  या प्रकरणाचे फुटेज देखील समोर आलेले आहे. ते आपणही व्यवस्थित बघा. जे काम निवडणूक आयोगाचे आहे ते करत नसल्यामुळे असे प्रकार घडत आहेत, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. 

टॅग्स :mihir kotechaमिहिर कोटेचाmumbai-north-east-pcमुंबई उत्तर पूर्वBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४