शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या गुजरातेत गुंतवणुकीला ओहोटी

By admin | Updated: September 23, 2014 05:30 IST

गुंतवणुकीसाठी देशात गुजरात हे पहिल्या क्रमांकाच्या पसंतीचे राज्य असल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी वेळोवेळी केला

मुंबई : गुंतवणुकीसाठी देशात गुजरात हे पहिल्या क्रमांकाच्या पसंतीचे राज्य असल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी वेळोवेळी केला असला तरी प्रत्यक्षात २०११ पासून गुजरातेतील ओहोटी लागल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारितील ‘डिपार्टमेंट आॅफ इंडस्ट्रीयल पॉलिसी अँड प्रमोशन’ (डीआयपीपी) ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार २०११ च्या तुलनेत गेल्या तीनवर्षांत ही गुंतवणूक ३३ टक्क्यांनी घटल्याची नोंद झाली आहे. विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार २०११ मध्ये गुजरातमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एकूण ५४४ प्रस्ताव आले होते. या अंतर्गत सुमारे १.४२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आली होती. या तुलनेत, २०१३ मध्ये केवळ ३५४ प्रस्ताव आले असून यापोटी ९५ हजार २५९ कोटी रुपयांचीच गुंतवणूक झाली. तर, २०१४ मध्ये आतापर्यंत झालेल्या गुंतवणुकीतही घट दिसून आली असून २०१३ च्या याच कालावधीच्या तुलनेत ही घट ६४ टक्के इतकी आहे. २०१३ मध्ये या कालावधीपर्यंत गुजरातेत ६१ हजार ८४२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. मात्र, यंदा आतापर्यंत अवघी २१ हजार ९७९ कोटी रुपयांचीच गुंतवणूक झाली आहे. केवळ नवीन गुंतवणूकच नव्हे तर सध्या कार्यरत कंपन्यांनी देखील विस्तारासाठी फारशी हालचाल केली नसल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)