शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नक्षली भागात मोबाइल टॉवर

By admin | Updated: June 13, 2015 02:07 IST

जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागासाठी शासनान ७८ टॉवर मोबाइल मंजूर केले असून, यातील ११ टॉवर्सचे बांधकाम पूर्ण झाले असून, नऊ टॉवरचे बांधकाम सुरू आहे.

दिगांबर जवादे, गडचिरोलीजिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागासाठी शासनान ७८ टॉवर मोबाइल मंजूर केले असून, यातील ११ टॉवर्सचे बांधकाम पूर्ण झाले असून, नऊ टॉवरचे बांधकाम सुरू आहे. टॉवरची संख्या वाढल्याने विकासास गती मिळून नक्षल चळवळीस मोठा हादरा बसण्याची वर्तविली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात सद्य:स्थितीत बीएसएनएलचे १२५ टॉवर आहेत. जिल्ह्याचा विस्तार लक्षात घेता टॉवरची संख्या अत्यंत कमी आहे. दुर्गम व नक्षलग्रस्त भागात मोबाइल टॉवर नसल्याने संदेशवहनात अडचणी निर्माण होत होत्या. नक्षल्यांकडून याचा गैरफायदा घेतला जात होता. पोलिसांनाही नक्षलविरोधी अभियान राबविताना अनेक अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन शासनाने नक्षलग्रस्त भागात मोबाइलचे जाळे तयार करण्याचा निर्णय घेतला. त्या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त भागात मोबाइल टॉवर उभारण्यास मंजुरी दिली आहे.केंद्रीय गृहमंत्रालयाने मागील वर्षी ३७ मोबाइल टॉवर उभारण्याला मंजुरी दिली. वर्षभराच्या कालावधीत यातील ११ टॉवरचे बांधकाम पूर्ण झाले आहे. नऊ टॉवरचे बांधकाम सुरू आहे. तर उर्वरित १७ टॉवरच्या बांधकामाला लवकरच सुरूवात होणार असल्याची माहिती बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी दिली. फेज-सात अंतर्गत २० टॉवरचे बांधकाम मंजूर केले आहे. गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने १५ टॉवरला मंजुरी दिली आहे. या टॉवरचे बांधकामही बीएसएनएल लवकरच सुरू करणार आहे. नक्षलग्रस्त जिल्हा असल्याने जिल्'ात सीआरपीएफचे हजारो जवान कार्यरत आहेत. मात्र मोबाईल नेटवर्क नसल्याने या जवानांना त्यांच्या कुटुंबियांसोबत संवाद साधण्यात अडचण निर्माण होत होती. ही बाब लक्षात घेऊन सेंट्रल आर्म्ड पॅरामिल्ट्री फोर्सच्या वतीने भामरागड येथे एक टॉवर मंजूर करण्यात आला आहे.