"कोरोनाचं निमित्त साधून तिघाडी सरकारने महाराष्ट्राच्या भवितव्याशी जो खेळ चालवलाय तो निंदनीय"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 04:02 PM2021-10-14T16:02:23+5:302021-10-14T16:09:51+5:30

MNS Shalini Thackeray And Thackeray Government : मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

MNS Shalini Thackeray Slams Thackeray Government Over Schools in maharashtra | "कोरोनाचं निमित्त साधून तिघाडी सरकारने महाराष्ट्राच्या भवितव्याशी जो खेळ चालवलाय तो निंदनीय"

"कोरोनाचं निमित्त साधून तिघाडी सरकारने महाराष्ट्राच्या भवितव्याशी जो खेळ चालवलाय तो निंदनीय"

Next

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून राज्यात 4 ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचं पालन करुन शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. याच दरम्यान आता मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे (MNS Shalini Thackeray) यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार निशाणा साधला आहे. "कोरोनाचं निमित्त साधून या तिघाडी सरकारने महाराष्ट्राच्या भवितव्याशी जो खेळ चालवला आहे तो निंदनीय आहे" असं म्हणत जोरदार टीका केली आहे. तसेच "शिक्षणद्रोही सरकारला लवकर सुबुद्धी येवो आणि विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न सुटोत" अशी प्रार्थना देखील मनसेने देवीकडे केली आहे. 

शालिनी ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "आज दीड वर्षांनी शाळा उघडतायत मात्र  शाळा सुरू नसतानाही खाजगी शाळांनी पालकांकडून सर्रास फी घेऊन लूट माजवली. एमपीएससी आणि इतर महत्त्वांच्या परीक्षांचा सावळा गोंधळ तर अजूनही सुटला नाही, परिणामी सर्व विद्यार्थ्यांचं भविष्य अजूनही अंधारातच आहे. त्याची जबाबदारी हे सरकार कधी घेणार? कोरोनाचं निमित्त साधून या तिघाडी सरकारने महाराष्ट्राच्या भवितव्याशी जो खेळ चालवला आहे तो निंदनीय आहे. दरदिवशी वेगवेगळे मंत्री वेगवेगळे निर्णय घेऊन विद्यार्थी आणि पालक यांना अजूनच बुचकाळ्यात पाडत आहेत" असं म्हटलं आहे.

"आई, आज तुझ्या माध्यमातून या शिक्षणद्रोही सरकारला लवकर सुबुद्धी येवो आणि विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न सुटोत अशी प्रार्थना करते... 
"आई माझी अशी..
हाकेला धाव ग..
शिक्षणाचा झाला आमच्या 
पुरता खेळखंडोबा ग..
कोण काय निर्णय घेते 
याचा ना कुणाला मेळ ग..
तूच आता हातात घे छडी 
आणि दे यांना शिक्षा ग..""  असं शालिनी ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

आणखी वाचा

"कोरड्या आश्वासनाच्या पलीकडे जाऊन ठोस कृती करणारे मुख्यमंत्री दिसू दे"; मनसेचं देवीपुढे गाऱ्हाणं

-  "कोरोना काळात महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा, लोकांना घाबरवण्याचं केलं काम" 


 

Web Title: MNS Shalini Thackeray Slams Thackeray Government Over Schools in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app