Vidhan Sabha 2019: ...अन् थापाड्यांचे पाय लटलटले! भाजपाच्या 'कार्टुन'वर मनसेचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 10:18 PM2019-09-21T22:18:15+5:302019-09-21T22:21:54+5:30

भाजपाने आज दुपारीच ट्विटरवर राज ठाकरेंवरील व्यंगचित्र पोस्ट करत आज विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या, आता ही सोंगटी कोणत्या चौकटीत पडणार? असा सवाल केला होता.

MNS reply on BJP's 'cartoon' of raj Thackeray; devendra fadanvis target | Vidhan Sabha 2019: ...अन् थापाड्यांचे पाय लटलटले! भाजपाच्या 'कार्टुन'वर मनसेचे प्रत्युत्तर

Vidhan Sabha 2019: ...अन् थापाड्यांचे पाय लटलटले! भाजपाच्या 'कार्टुन'वर मनसेचे प्रत्युत्तर

googlenewsNext

मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर लगेचच भाजपानेमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कार्टुन काढत खिल्ली उडविली होती. यानंतर लगेचच मनसेने प्रत्यूत्तर दिल्याने सोशल मिडीयावर वादाची ठिणगी पडली आहे. 


भाजपाने आज दुपारीच ट्विटरवर राज ठाकरेंवरील व्यंगचित्र पोस्ट करत आज विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या, आता ही सोंगटी कोणत्या चौकटीत पडणार? असा सवाल केला होता. यामध्ये राज ठाकरे यांच्या 2004 पासूनच्या बदलत्या भुमिकांची खिल्ली उडविण्यात आली होती. यासाठी मुलींच्या एका खेळाचे चित्र रेखाटत आता ही सोंगटी कोणाच्या चौकटीत जाणार असे विचारले होते. 


राज ठाकरे 2004 च्या निवडणुकीवेळी शिवसेनेत होते. मात्र, त्यांच्या पसंतीचे उमेदवार कमी देण्यात आले होते. यानंतर राज यांनी 2006 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडत मनसेची स्थापना केली होती. यानंतरच्या निवडणुका मनसे एकट्याने लढत होती. 2009 मध्ये मनसेचे 288 पैकी 13 आमदार निवडून आले होते. मुंबई, कल्याणच्या महापालिकेतही चांगले यश मिळाले होते. यामुळे शिवसेनेला मनसेचा मोठा फटका बसत होता. मात्र, राज ठाकरे यांची बदलती भुमिका पक्षाला मारक ठरत गेली.2014 मध्ये लोकसभेला राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पसंती दिली होती. मात्र, लोकसभा निवडणूकही लढविली होती. या दुटप्पी भुमिकेमुळे मनसेला खासदार निवडून आणता आला नाही. 2014 मध्ये विधानसभेला मनसेचा तर एकच आमदार निवडून आला. तोपर्यंत मनसेच्या नेत्यांनी रामराम करत शिवसेना, भाजपाचा रस्ता धरला होता. यानंतर 2019 मध्ये लोकसभेला मनसेने निवडणूक न लढविण्याचीच भुमिका घेतली. आणि यावेळी त्यांनी 2014 च्या उलट मोदींना विरोध केला होता. 


यावर मनसेनेही '...अन् थापाड्यांचे पाय लटलटले!'या मथळ्याखाली ट्विटरवर फडणवीसांचे पाठमोरे व्यंगचित्र पोस्ट केले आहे. यामध्ये राजभाषेच्या चाहुलीने सत्ताधारी थबकले, फक्त बातमीनेच थापाड्यांचे पाय लटपटले... असे म्हटले आहे. 


लोकसभेला 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत राज ठाकरेंनी थेटपणे काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत केली होती. भाजपा विरोधातील मतांचे ध्रुवीकरण भाजपाच्या पथ्यावर पडेल, या कारणामुळे राज यांनी हा निर्णय घेतला होता. एकही उमेदवार उभा नसताना राज ठाकरेंनी सभा घेतल्या होत्या. यामुळे त्यांच्या सभांचा खर्च कोणाच्या खात्यात टाकायचा असा प्रश्नही निवडणूक आयोगाला पडला होता. अशा दर निवडणुकीला भुमिका बदलण्याच्या राज ठाकरे यांच्या स्वभावाचा भाजपाने समाचार घेतला आहे. 

Web Title: MNS reply on BJP's 'cartoon' of raj Thackeray; devendra fadanvis target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.