शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
4
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
5
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
6
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
7
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
8
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
9
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
10
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
11
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
12
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
13
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
14
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
15
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
16
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
17
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
18
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
19
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
20
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर

राज ठाकरे लवकरच नव्या भूमिकेत; जाणून घ्या 'राज' की बात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 6:32 PM

राजकारण, व्यंगचित्र ही क्षेत्रे हाताळल्यानंतर आता राज ठाकरे एका नव्या भूमिकेतून समोर येत आहेत.

पुणे :  राजकीय नेता, व्यंगचित्रकार, प्रभावी वक्ता अशी ओळख असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता नव्या स्वरूपात महाराष्ट्राच्या भेटीला येत आहेत. काकांकडून व्यंगचित्र, वडिलांकडून संगीताचा वारसा आणि सास-यांकडून नाटकांविषयीची प्रगल्भता असे पैलू  जवळून अनुभवले असल्याने त्यांना कलांबददल असलेली आपुलकी वेळोवेळी दिसून आली आहेच. मात्र त्याही पलीकडे जाते ठाकरे आता गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर पुस्तक लिहीत असल्याचेच समजते. '

त्यांनी लतादीदी यांच्या दुर्मिळ छायाचित्रांसाठी पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) आणि  भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेला आज भेट दिली. त्यावेळी त्यांच्या या गुपिताचा उलगडा झाला. या दोनही संग्ग्रहालयात त्यांनी लता दीदी यांचे दुर्मिळ फोटो बघितले. काकांकडून व्यंगचित्र,  वडिलांकडून संगीताचा वारसा आणि सास-यांकडून नाटकांविषयीची प्रगल्भता हे पैलू त्यांनी जवळून  अनुभवले आहेत. राजकारण, व्यंगचित्र ही क्षेत्रे हाताळल्यानंतर आता राज ठाकरे एका नव्या भूमिकेतून समोर येत आहेत. तेही ‘लेखकाच्या’. 

           एनएफएआयच्या अमूल्य खजिन्यात लता दीदी यांचे काही जुने तरूणपणातील दुर्मिळ फोटो, काही त्यांचे सासरे मोहन वाघ यांनी काढलेले फोटो संग्रही आहेत .ते पाहिल्यानंतर एनएफएआयकडून त्यांनी हे फोटो मिळण्याची विनंती केली. त्यांच्या या विनंतीला मान देऊन हे फोटो त्यांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती एनएफएआयच्या विश्वसनीय सूत्रांकडून  ‘लोकमत’ला देण्यात आली. आरती कारखानीस यांनी संस्थेतील दुर्मिळ खजिन्याचे दर्शन राज ठाकरे यांना घडविले आणि चित्रपट जतनासाठी करण्यात येत असलेल्या डिजिटलायझेशनसह संग्रहालयातील अमूल्य ठेव्याची माहिती दिली.

            संग्रहालयातील छायचित्र, सॉंग्स बुकलेट त्यांनी पाहिली. संग्रहातील ‘सरकारी पाहुणे’चित्रपटा चे पोस्टर त्यांना  विशेष आवडले. लता मंगेशकर यांचे दुर्मिळ फोटो, बाबूराव पेंटर, शाहूमहाराज यांचा चित्र काढतानाचा फोटो त्यांना दाखविण्यात आला. चित्रपटांचा संपूर्ण डेटा बेस पाहून ते भारावून गेले. हा खजिना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी अधिकाधिक प्रयत्न व्हायला पाहिजेत, पुस्तकस्वरूपात या गोष्टी यायला पाहिजेत अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.  छत्रपती शिवाजी महाराज यांना दैवत मानत असल्याने त्यांनी एनएफएआयच्या संग्रहात असलेल्या  ‘किल्ले रायगड’ या दुर्मिळ चित्रफितीचा आस्वादही प्रिव्हू थिएटरमध्ये बसून घेतला. त्यानंतर त्यांनी संग्रहालयाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या जयकर बंगल्याची पाहाणी केली. या बंगल्याच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्पापर्यंत पोहोचले आहे. त्याचेही कौतुक ठाकरे यांनी केले. एफटीआयआयमध्ये त्यांनी जुना स्टुडिओ, एडिटिंग रूमला भेट दिली. तसेच प्रभातच्या जुन्या संग्रहालयालाही त्यांनी भेट दिली. त्यामुळे राजकारणासोबत एका नव्या इनिंगसह ठाकरे सज्ज झाले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेLata Mangeshkarलता मंगेशकरMNSमनसे