शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

पोलिसांना १०० कोटी, तर मग मुंबई महापालिकेला किती टार्गेट असेल? मनसेची विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 12:07 PM

param bir singh letter: राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भाजप (BJP), मनसे (MNS), रिपाइं या पक्षाच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला घेरले आहे.

ठळक मुद्देट्विटरवरून मनसेचा रोकडा सवालहीच ती वेळ विरप्पनगॅंगला कायमच क्वारंटीन करण्याची - देशपांडेमुंबई पोलिसांना १०० कोटीचं टार्गेट असेल, तर महापालिकेला कितीच असेल - देशपांडे

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहिले असून, अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा खळबळजनक दावा  केला आहे. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भाजप (BJP), मनसे (MNS), रिपाइं या पक्षाच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला घेरले आहे. यातच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून जोरदार टीका केली आहे. पोलिसांना १०० कोटींचे टार्गेट दिले होते, तर मग मुंबई महापालिकेला कितीचं टार्गेट दिलं असेल, असा रोकडा सवाल देशपांडे यांनी केला आहे. (mns leader sandeep deshpande slams thackeray govt over param bir singh letter bomb)

मुंबई पोलिसांना १०० कोटीचं टार्गेट असेल, तर महापालिकेला कितीच असेल, अशी विचारणा संदीप देशपांडे यांनी केली आहे. ते पुढे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, हीच ती वेळ विरप्पनगॅंगला कायमच क्वारंटीन करण्याची.

महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी घटना

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. 

परमबीर सिंगांच्या पत्रातील सर्वांत महत्त्वाचे १० मुद्दे; शरद पवारांनाही माहिती असल्याचा दावा

मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री देशमुखांचा राजीनामा घ्यावा

परमबीर सिंग यांच्या आरोपांनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. सिंग यांनी केलेले आरोप केवळ खळबळजनक नाहीत, तर ते अतिशय धक्कादायक आहेत. डीजी दर्जाचा अधिकारी इतक्या गंभीर स्वरुपाचे आरोप करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पोलीस दलात धक्कादायक घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसांचे मनोधैर्य खच्ची होत आहेत. पण ही घटना म्हणजे या प्रकरणातला कळस आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांचा राजीनामा घ्यावा, असे फडणवीस म्हणाले.

"महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी घटना; गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा"

उद्धव ठाकरेंना सरकार चालवण्याचा अधिकार नाही

रामदास आठवले यांनी ट्विटच्या माध्यमातून परमबीर सिंग प्रकरणावर आपले मत मांडले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही सरकार चालविण्याचा अधिकार राहिला नाही, अशी टीका रामदास आठवले यांनी केली आहे.  

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगsachin Vazeसचिन वाझेSandeep Deshpandeसंदीप देशपांडेMNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारण