शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

“गेल्या वर्षभरात कृष्णकुंज हा मंत्रालयाचा दुसरा पत्ता झाला होता, हे लक्षात ठेवा”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 15:54 IST

corona and lockdown issues: मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी फेसबुक लाइव्ह करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

ठळक मुद्देकृष्णकुंज हा मंत्रालयाचा दुसरा पत्ता झाला होता - मनसेजनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यांबद्दलची विश्वासार्हता कमी झाली - मनसेव्यापारी शेतकऱ्यांना मालाची कमी किंमत देत आहेत - मनसेचा दावा

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी रात्री राज्यातील जनतेला संबोधित केले. यावरून भाजपसह अन्य विरोधी पक्षांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी फेसबुक लाइव्ह करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकांना भेटत नव्हते, पण गेल्या वर्षभरात अनेकांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे गाऱ्हाणे मांडले, अशी खोचक टीका संदीप देशपांडे यांनी केली. (sandeep deshpande criticised thackeray govt over corona and lockdown issues)

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री साहेब, तुमचं ऐकलं, आता आमचं ऐका...किंबुहना ऐकाच, असे म्हणत फेसबुक लाइव्ह केले. यावेळी त्यांनी कोरोना परिस्थिती, लॉकडाऊनची टांगती तलवार, आरोग्य यंत्रणा यांवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला. लॉकडाऊनची भीती जनतेला दाखवली जात आहेत. लॉकडाऊनच्या भीतीमुळे व्यापारी शेतकऱ्यांना कमी किंमत देत आहेत, असा दावा देशपांडे यांनी यावेळी केला. 

राज्य सरकारचा जनतेला केवळ त्रास, मुख्यमंत्र्यांचं भाषणच कळलं नाही; फडणवीसांचा टोला

कृष्णकुंज हा मंत्रालयाचा दुसरा पत्ता झाला होता

गेल्या वर्षभरात राज ठाकरे अनेकांना भेटले. डबेवाले, डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवक, शिक्षक, मच्छिमार बांधव असोत, या सर्वांना राज ठाकरे भेटले. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना दिलासा देण्याचे काम सातत्याने आणि नियमितपणे राज ठाकरे यांनी केले. आमच्यावर टीका करण्याचा तुम्हांला बिलकूल अधिकार नाही. तुम्ही घरी बसून होता आणि राज ठाकरे जनतेला भेटत होते. गेल्या वर्षभरात कृष्णकुंज हा मंत्रालयाचा दुसरा पत्ता झाला होता. राज ठाकरे लोकांना भेटत असल्यामुळे कृष्णकुंजवर गर्दी वाढत होती. तुम्ही कोणालाच भेटत नव्हता, त्यामुळे तुमच्याकडे कोणीही येत नव्हते, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला. 

जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यांबद्दलची विश्वासार्हता कमी झालीय; मनसेचा पलटवार

मुख्यमंत्र्यांकडून शिकण्याची गरज नाही

लोकांच्या मनातील मुख्यमंत्र्यांबद्दल विश्वासार्हता कमी झाली आहे. रस्त्यावर उतरून मदत कशी करायची, हे आता मुख्यमंत्र्यांकडून शिकण्याची गरज नाही. कोरोनाच्या काळात मनसे सैनिकांनी अगदी लाठ्या मारणाऱ्या पोलिसांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांना शक्य ती सगळी मदत केली आहे. सरकारकडून काहीही मदत करण्यात आली नाही. कोरोना काळात जम्बो कोव्हिड सेंटर उभारून ओळखीच्या लोकांना काम देणे आणि पैसे वाटणे हेच काम सरकारने केले, अशी गंभीर टीका देशपांडे यांनी केली. 

महापौर आणि अस्लम शेख यांच्यावर टीका

लॉकडाऊन नेमका कशासाठी करायचा आहे, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. एक दिवसाच्या नर्सबाईंनी आम्हांला शिकवू नये, असा घणाघात संदीप देशपांडे यांनी यावेळी बोलताना केला. तसेच लॉकडाऊन हवा आहे, असे म्हणणाऱ्या अस्लम शेख यांनी मालवणी या त्यांच्या मतदारसंघात जाऊन आधी पाहावे. किती लोकं नियम पाळतात, मास्क किती जण घालतात, याचा आढावा घ्यावा, असा टोला संदीप देशपांडे यांनी यावेळी बोलताना लगावला. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेSandeep Deshpandeसंदीप देशपांडेMNSमनसेState Governmentराज्य सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliticsराजकारण