mns leader sandeep deshpande slams thackeray govt over corona and lockdown issues | जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यांबद्दलची विश्वासार्हता कमी झालीय; मनसेचा पलटवार

जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यांबद्दलची विश्वासार्हता कमी झालीय; मनसेचा पलटवार

ठळक मुद्देमनसेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पलटवारमुख्यमंत्र्यांकडून शिकण्याची गरज नाही - देशपांडेलॉकडाऊनच्या भीतीमुळे समस्येत वाढ - मनसेचा दावा

मुंबई : राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊन होणार का, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी रात्री राज्यातील जनतेला संबोधित केले. यावरून भाजपसह अन्य विरोधी पक्षांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी फेसबुक लाइव्ह करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यांबद्दलची विश्वासार्हता कमी झाली आहे, असे देशपांडे म्हणाले. (sandeep deshpande slams thackeray govt over corona and lockdown issues)

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री साहेब, तुमचं ऐकलं, आता आमचं ऐका... किंबुहना ऐकाच, असे म्हणत फेसबुक लाइव्ह केले. यावेळी त्यांनी कोरोना परिस्थिती, लॉकडाऊनची टांगती तलवार, आरोग्य यंत्रणा यांवर हल्लाबोल केला. आनंद महिंद्रा यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेत, कोरोना संकटाच्या काळात अनेकांनी सरकारला जनतेला मदत केली. कोरोनाचे प्रमाण, प्रादुर्भाव कमी झाला. तेव्हा सरकारने अनेकांना नोकरीवरून काढून टाकले. मग आता पुन्हा लोकांना कसे बोलावणार, असा सवाल करत गरज संपल्यावर त्यांना सरकारने लाथाडले आणि पुन्हा आरोग्य सेवक कमी पडताहेत म्हणून मुख्यमंत्री सांगताहेत. लोकांनी विश्वास कसा ठेवावा. लोकांच्या मनातील मुख्यमंत्र्यांबद्दल विश्वासार्हता कमी झाली आहे, अशी टीका देशपांडे यांनी केली. 

“माझे कुटुंब, माझी जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री स्वतःच्या कुटुंबाचं संरक्षण करू शकले नाहीत”

लॉकडाऊनच्या भीतीमुळे समस्येत वाढ

लॉकडाऊनची भीती जनतेला दाखवली जात आहेत. लॉकडाऊनच्या भीतीमुळे व्यापारी शेतकऱ्यांना कमी किंमत देत आहेत, असा दावा करत गेल्या वर्षभरात गर्दी कमी करण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केल्या, किती अधिकाऱ्यांशी सल्ला-मसलती केल्यात, अशी विचारणा संदीप देशपांडे यांनी यावेळी केली. 

मुख्यमंत्र्यांकडून शिकण्याची गरज नाही

रस्त्यावर उतरून मदत कशी करायची, हे आता मुख्यमंत्र्यांकडून शिकण्याची गरज नाही. कोरोनाच्या काळात मनसे सैनिकांनी अगदी लाठ्या मारणाऱ्या पोलिसांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांना शक्य ती सगळी मदत केली आहे. सरकारकडून काहीही मदत करण्यात आली नाही. कोरोना काळात जम्बो कोव्हिड सेंटर उभारून ओळखीच्या लोकांना काम देणे आणि पैसे वाटणे हेच काम सरकारने केले, अशी गंभीर टीका देशपांडे यांनी केली. 

राज्य सरकारचा जनतेला केवळ त्रास, मुख्यमंत्र्यांचं भाषणच कळलं नाही; फडणवीसांचा टोला

दरम्यान, कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने २० लाख कोटींचे पॅकेज गेल्या वर्षभरात दिले. देशातील अन्य राज्यांनीही जनतेसाठी पॅकेज दिले. केवळ महाराष्ट्राने एक पैशांचेही पॅकेज दिले नाही. मात्र, त्याऐवजी लोकांचे वीज कनेक्शन कापणे, लोकांना त्रास देणे यावरच भर दिला. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उत्तर दे, टोलेबाजी कर, सल्ला देतात त्यांना उत्तर दे यातच वेळ घालवला, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: mns leader sandeep deshpande slams thackeray govt over corona and lockdown issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.