शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांची 5000 KM दूर असलेल्या देशावर हल्ल्याची तयारी, केव्हाही होऊ शकतो हल्ला? एअरस्पेस बंदची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 22:38 IST

ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल' प्लॅटफॉर्मवरून एअरस्पेस बंद करण्यासंदर्भात घोषणा केली आहे...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएला (Venezuela) आणि जवळपासचा एअरस्पेस (Airspace) 'बंद' (Closed) घोषित केला आहे. व्हेनेझुएलावर दबाव वाढवण्याचा हा ट्रम्प यांचा आणखी एक प्रयत्न मानला जात आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांचे सरकार 'अवैध' घोषित केले होते. आता ट्रम्प यांच्या या कृतीमुळे अमेरिका व्हेनेझुएलावर हल्ला करण्याच्या तयारीत तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महत्वाचे म्हणजे, व्हेनेझुएला अमेरिकेपासून तब्बल 5000 किलोमीटर दूर आहे.

ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल' प्लॅटफॉर्मवरून एअरस्पेस बंद करण्यासंदर्भात घोषणा केली आहे. त्यांनी सर्व एअरलाइन, पायलट, ड्रग्ज डीलर्स आणि मानवी तस्करांना उद्देशून लिहिले आहे की, "कृपया, व्हेनेझुएलावरील आणि त्याच्या जवळपासचे हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद मानावे." ट्रम्प यांच्या या आदेशावर, अद्याप व्हेनेझुएलाच्या संपर्क मंत्र्यांची कुोठलीही प्रतिक्रिया आलेली नाही, तसेच अमेरिकेच्या संरक्षण विभागानेही त्यांच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिलेली नाही. 

तत्पूर्वी, कॅरिबियनमध्ये (Caribbean) कथित ड्रग्ज बोटींविरुद्ध अमेरिकेचे हल्ले गेल्या काही महिन्यांपासून सुरूच आहेत. या शिवाय या भागात अमेरिकेची सैन्यतैनातही वाढली आहे. ट्रम्प यांनी व्हेनेझुएलामध्ये गुप्त सीआयए (CIA) मोहिमांना अधिकृतता दिली आहे. या आठवड्यात त्यांनी सैन्यदलाच्या सदस्यांना सांगितले होते की, व्हेनेझुएलातील संशयित ड्रग्ज तस्करांना रोखण्यासाठी अमेरिका लवकरच जमिनी स्तरावर मोहीम सुरू करेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Trump's Venezuela threat: Airspace closed, potential attack looms 5000km away?

Web Summary : Trump declared Venezuela's airspace closed, escalating pressure. Military buildup and CIA operations hint at a possible intervention against alleged drug trafficking, despite the 5000km distance.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाUSअमेरिका