शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
2
Top Marathi News LIVE: "महागाई मॅन आता आणखी वसुली करेल"; काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका
3
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
4
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
5
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
6
सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
8
शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर ‘सीबीआय’चा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला, तपासणी सत्र सुरूच!
9
समुद्रात दादागिरी! इराणने 'होर्मुझ स्ट्रेट'वर लागू केला स्वतःचा कायदा; एका जहाजाकडून वसूल करताहेत 'इतके' कोटी
10
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
11
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
12
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
13
अधिक मास २०२६: अधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी? सविस्तर वाचा
14
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
15
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
16
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
17
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
18
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
19
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
20
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत बिकट आणि आपण मोबाईलमध्ये अडकलोय; राज ठाकरे असं का म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 21:18 IST

Raj Thackeray Gudi Padwa Melava: दरवर्षीप्रमाणे यंदाही दादरच्या ऐतिहासिक शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भव्य गुढीपाडवा मेळावा उत्साहात पार पडला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही दादरच्या ऐतिहासिक शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भव्य गुढीपाडवा मेळावा उत्साहात पार पडला. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर राज ठाकरे यांची ही पहिलीच मोठी जाहीर सभा असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष त्यांच्या भाषणाकडे लागले होते. अपेक्षेप्रमाणे राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत सद्यस्थितीवर भाष्य करत राज्यातील तरुणाईला वास्तवाची जाणीव करून दिली.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीवर बोट ठेवले. ते म्हणाले की, "आज महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. संपूर्ण राज्य कर्जाच्या विळख्यात अडकले आहे. तुम्ही राज्यातील कोणत्याही शहरात जा, तिथे ना कसला आकार उरला आहे ना उकार आहे. शहरांची दुरवस्था झाली आहे."

मुंबईत नव्याने झालेल्या कोस्टल रोडवर बोलताना राज ठाकरे यांनी एक वेगळाच दृष्टिकोन मांडला. "कोस्टल रोड बांधला गेलाय खरा, पण तो तुमच्या सोयीसाठी झालेला रस्ता नाही. तो इतरांना मुंबईत सहज येण्यासाठी आणि तुम्हाला मुंबईच्या बाहेर काढण्यासाठीचा मार्ग आहे," असा खळबळजनक दावा त्यांनी केला.

"आम्ही फक्त मोबाईलवर व्यक्त होतोय!"

राज्यातील ज्वलंत प्रश्नांवर बोलताना राज ठाकरेंनी तरुणांच्या मानसिकतेवर प्रहार केला. ते म्हणाले की, "राज्यात शेतकरी दररोज आत्महत्या करत आहे, परिस्थिती गंभीर आहे. परंतु, आपण हे सर्व फक्त पाहतोय आणि केवळ मोबाईलवर व्यक्त होतोय. आपण व्हर्च्युअल जगात अडकलो आहोत." मैदानात उतरून संघर्ष करण्याऐवजी तरुण पिढी केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित राहिल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तरुणांचे कान टोचले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाMNSमनसेMNS Gudi Padwa Rallyमनसे गुढीपाडवा मेळावा