शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

आमदार-खासदारांशी सौजन्याने वागण्याचे फर्मान

By admin | Updated: July 16, 2015 00:11 IST

कायद्यासमोर सर्व नागरिक समान असल्याचे राज्यघटनेत नमूद असले तरी आधुनिक राज्यकर्ते आणि त्यांच्या नेत्यांसाठी विशेष वागणूक देण्याचे फर्मान महाराष्ट्र सरकारने काढले आहे.

- जमीर काझी, मुंबईकायद्यासमोर सर्व नागरिक समान असल्याचे राज्यघटनेत नमूद असले तरी आधुनिक राज्यकर्ते आणि त्यांच्या नेत्यांसाठी विशेष वागणूक देण्याचे फर्मान महाराष्ट्र सरकारने काढले आहे. त्यानुसार आमदार-खासदारांशी आदराने व सौजन्याने वागावे अन्यथा शिस्तभंगाचा बडगा उगारला जाईल, अशी सूचना राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांच्यातर्फे करण्यात आली आहे.पावसाळी अधिवेशनात राज्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवरून सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये जोरदार संघर्ष होण्याचे संकेत पहिल्या तीन दिवसांच्या कारभारावरून स्पष्ट झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर हुज्जत घालणाऱ्या आमदारांना रोखण्यासाठी कडक धोरण राबविण्याची आवश्यकता असताना त्यांच्याशी सभ्यतेने वागण्याबाबतची सूचना महासंचालकांतर्फे विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) प्रभात कुमार यांना सोमवारी विशेष परिपत्रकानुसार केली. राज्यातील सर्व आयुक्त व अधीक्षकांनी ही बाब अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यास याद्वारे सुचविण्यात आले आहे. सरकारी अधिकारी, कर्मचारी विशेषत: पोलीस लोकप्रतिनिधींशी व्यवहार करताना सौजन्य व आदराची वागणूक देण्यात कुचराई करतात, असा आक्षेप विधानसभेच्या विशेषाधिकार समितीने नोंदविला होता. त्यामुळे आमदार-खासदारांना सन्मानाची वागणूक देण्याबाबत शासनाने स्वतंत्रपणे सूचना कराव्यात, असा विशेष ठराव विधानसभेत एकमताने केला. त्यानुसार पोलीस महासंचालकांनी खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्याबाबत बजावले आहे. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या लोकप्रतिनिधींना रोखतानाही पोलिसांना त्यांच्याशी सौजन्याने वागावे लागणार आहे. त्यांच्याकडून अपमानास्पद वर्तणूक झाल्यास किंवा त्याबाबत आक्षेप नोंदविल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शिस्तंभगाची कारवाई करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्याची खातेनिहाय चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे कायद्याचे पालन करायचे की आमदार-खासदारांची मर्जी सांभाळायची, असा प्रश्न पोलीस अधिकाऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे.विधिमंडळांने मंजूर केलेल्या ठरावानुसार पोलिसांना ड्युटी बजावताना लोकप्रतिनिधींशी आदर व सौजन्याने वागावे लागणार आहे. त्यांच्याकडून याचे उल्लंघन झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल.- प्रभात कुमार, विशेष महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था)