शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

सभापतींच्या निवडणुकीत चमत्कार?

By admin | Updated: September 28, 2014 01:06 IST

विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती मोडित निघाली आहे. याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या राजकारणात उमटणार असल्याने ४ आॅक्टोबरला होणाऱ्या सभापतिपदाच्या निवडणुकीत चमत्कार घडण्याची

जिल्हा परिषद : नवीन समीकरणाची चाचपणीनागपूर : विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती मोडित निघाली आहे. याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या राजकारणात उमटणार असल्याने ४ आॅक्टोबरला होणाऱ्या सभापतिपदाच्या निवडणुकीत चमत्कार घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र होते. युती व घटकपक्ष सदस्यांच्या मदतीने भाजपने अध्यक्ष तर उपाध्यक्षपद शिवसेनेला देण्यात आले. परंतु सत्तेत वाटेकरी वाढल्याने शिवसेनेच्या वाट्याला उपाध्यक्षांचे एकच पद आले. चार सभापतींची निवड करताना शिवसेनेला सभापतिपद दिले जाईल अशी ग्वाही दिली होती. परंतु राज्यातील राजकीय घडामोडीचे पडसाद जि.प.च्या राजकारणात उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप -शिवसेनेची ताटातूट झाल्याने सभापतिपदाच्या निवडणुकीतही भाजप-सेनेचा घटस्फोट होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यातच बांधकाम समिती भाजपकडे असावी यासाठी पक्ष सदस्यांनी मोर्चेबांधणी के ल्याने शिवसेनेत अस्वस्थता वाढली आहे. २१ सप्टेंबरला जि.प.च्या शिक्षण, कृषी व पशुसंवर्धन, आरोग्य, महिला व बालकल्याण आदी विभागाच्या सभापतीची निवड केली जाणार आहे. परंतु विशेष सभेपूर्वीच युतीत वाद निर्माण झाल्याने शिवसेनेचे उपाध्यक्ष शरद डोणेकर यांना बांधकाम समिती देण्याला सत्तापक्षातील काही सदस्यांनी उघड विरोध दर्शविला आहे. त्यांना कृषी समिती द्यावी, असा प्रस्ताव पुढे आला आहे.सत्तेत सहभागी घटक पक्षाच्या सदस्यांना नाराज न करता त्यांना आश्वासनानुसार सभापतीपद दिले जाणार आहे. त्यामुळे बसपा, रिपाइं व गोंगपाच्या सदस्यांची सभापतिपदावर वर्णी लागणार आहे. बांधकाम व शिक्षण समिती भाजपकडे असावी, असा पक्ष सदस्यांचा आग्रह असल्याने सभापतींच्या निवडणुकीत उलटफेर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (प्रतिनिधी)