शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीच्या लग्नाचा डाव मोडला

By admin | Updated: May 24, 2014 02:18 IST

मुंबईतील मुलीशी लग्न मोडून पुन्हा गावात जाऊन अल्पवयीन विद्यार्थिनीशी विवाह करण्याचा एका सोने व्यापार्‍याचा डाव उधळला गेला आहे

मुंबई : अंधश्रद्धेच्या आहारी जात मुंबईतील मुलीशी जमलेले लग्न मोडून पुन्हा गावात जाऊन अल्पवयीन विद्यार्थिनीशी विवाह करण्याचा एका सोने व्यापार्‍याचा डाव अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला आहे. मात्र आता या व्यापार्‍याने तिसर्‍या मुलीशी लग्नाचा घाट घातल्याची माहिती हाती आल्याने याविरोधात आपण दंड थोपटणार असल्याचे समितीच्या वंदना शिंदे यांनी सांगितले. भांडुप येथे राहणार्‍या आणि वांद्रे येथे सोन्याचे दुकान असणार्‍या एका सराफाने मुंबईतील एका मुलीशी विवाहाची बोलणी सुरू केली होती. मात्र अंधश्रद्धेच्या अधीन गेलेल्या त्याच्या आईवडिलांनी दोघांची कुंडली एका मांत्रिकाला दाखविली. त्यात त्यांचे ‘गुण’ जुळत नसल्याचे मांत्रिकाने सांगताच जमत आलेले लग्न व्यापार्‍याने मोडले. म्हसवडजवळील रांजनी हे या व्यापार्‍याचे गाव आहे. आता या व्यापार्‍याने आणि त्याच्या आईवडिलांनी सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील धुळदेव येथील एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी विवाह ठरविला. दहावीतील आपल्या मैत्रिणीचा विवाह तिच्यापेक्षा वयाने खूपच मोठ्या असणार्‍या इसमाशी लावला जात असल्याची माहिती तिच्या मैत्रिणींना कळली. त्यांनी ही माहिती वंदना शिंदे यांच्यामार्फत सातारा जिल्ह्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते प्रशांत पोतदार यांना कळविली. पोतदार यांनी गुप्त माहिती काढून विद्यार्थिनीसोबत विवाह होत असल्याची खात्री करून घेत ही बाब सातारा जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल पांडे यांच्या कानावर घातली. पांडे यांनी याबाबत तत्काळ कारवाई करण्याचे आदेश म्हसवड पोलीस ठाण्याला दिले. पोलिसांनी वेगाने हालचाली करून त्या अल्पवयीन मुलीच्या वयाचा पुरावा मिळविला आणि त्यानंतर ताबडतोब तिच्या आईवडिलांना पोलीस ठाण्यात बोलावून भारतीय दंडविधान संहितेच्या कलम १४९ अन्वये अल्पवयीन मुलीचे लग्न न करण्याची ताकीद दिली. अल्पवयीन मुलीशी लग्न करण्याचा डाव उधळला जाताच या व्यापार्‍याने त्या मुलीच्या आईवडिलांवर दबाव आणत ४ जून रोजी अन्य मुलीसोबत लग्न करण्याचा घाट घातला असल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हाती आली आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत विवाह होत असल्याची माहिती मिळताच आम्ही धुळदेवला जाऊन संबंधित मुलीच्या नातेवाइकांना कायदेशीर नोटीस दिली आहे. नवर्‍याकडील मंडळी जर लग्नासाठी आताच आग्रह धरत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे म्हसवड पोलीस ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक कोरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)