मंत्र्यांनी गृहपाठच केला नाही!

By Admin | Updated: March 13, 2015 01:49 IST2015-03-13T01:49:06+5:302015-03-13T01:49:06+5:30

राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी गृहपाठ न केल्याने एकाच दिवशी चार लक्षवेधी सूचना पुढे ढकलण्याची नामुश्की सत्ताधारी पक्षावर गुरुवारी

Ministers did not do homework! | मंत्र्यांनी गृहपाठच केला नाही!

मंत्र्यांनी गृहपाठच केला नाही!

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी गृहपाठ न केल्याने एकाच दिवशी चार लक्षवेधी सूचना पुढे ढकलण्याची नामुश्की सत्ताधारी पक्षावर गुरुवारी विधान परिषदेत ओढवली. एकाच दिवशी एकसारखी कारणे देऊन लक्षवेधी सूचना पुढे ढकलण्याची विनंती करणे ही गंभीर बाब असून, मंत्र्यांना समज द्या, असे निर्देश उपसभापती वसंत डावखरे यांनी संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांना दिले.
गोपीकिशन बाजोरिया यांनी अमरावती ते जळगाव व जळगाव ते गुजरात या मार्गाच्या चौपदरीकरणाबाबत लक्षवेधी सूचना दाखल केली होती. सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) चंद्रकांत पाटील यांनी ही लक्षवेधी सूचना नॅशनल हाय-वे आॅथॉरिटीशी संबंधित असून, त्यांच्याकडून लागलीच माहिती उपलब्ध होणार नसल्याने पुढे ढकलण्याची विनंती केली होती. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Ministers did not do homework!