शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांवर नाराजीची चर्चा; खुलासा करताना उदय सामंतांनी थेट 'ते' पत्रच दाखवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 13:38 IST

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत नाराजीच्या चर्चांवर सविस्तर खुलासा केला आहे.

Uday Samant: राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांवर नाराज असून त्यांनी ही नाराजी व्यक्त करणारं पत्र प्रधान सचिवांना लिहिल्याची चर्चा रंगत होती. या पार्श्वभूमीवर मंत्री सामंत यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर खुलासा केला आहे. "मी उद्योगमंत्री म्हणून ४ फेब्रुवारी रोजी उद्योग खात्याच्या प्रधान सचिवांना एक पत्र लिहिलं होतं. मंत्री म्हणून मला प्रधान सचिवांकडून कसं काम अपेक्षित आहे, याबाबत सूचना करणारं ते पत्र होतं. या पत्रात मी कसलीही नाराजी व्यक्त केली नव्हती. माझी नाराजी असण्याचं काहीच कारण नाही. प्रशासनाने धोरणात्मक निर्णय घेताना त्याची कल्पना मला द्यावी, असं मी पत्रातून सांगितलं आहे. कारण हे निर्णय घेतल्यानंतर त्याची माहिती पत्रकार परिषदेतून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला त्या निर्णयांची माहिती असणं आवश्यक आहे," अशी भूमिका सामंत यांनी मांडली आहे.

उदय सामंत पुढे म्हणाले की, "सत्तेचं विकेंद्रीकरण जसं राजकारणात महत्त्वाचं आहे तसं अधिकारांच्या बाबतही महत्त्वाचं आहे. सगळ्याच  गोष्टी मंत्र्यांकडे सहीसाठी आल्या पाहिजेत, असं असू नये, अशी भूमिका मी पत्रातून मांडली आहे. मी प्रधान सचिवांवर नाराज असण्याचा प्रश्नच नाही, कारण मी कॅबिनेट मंत्री आहे आणि ते माझ्या हाताखाली काम करतात. मी २०१३ मध्ये ९ खात्यांचा राज्यमंत्री होतो. त्यानंतर म्हाडाच्या अध्यक्षपदासह विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत आणि आता उद्योगमंत्री आहे. त्यामुळे प्रधान सचिव म्हणून त्यांचा मान-सन्मान, त्यांचे अधिकार आणि मंत्री म्हणून माझे अधिकार मला माहीत आहेत. फक्त प्रधान सचिवांनी उद्योग विभाग सहजरीत्या सांभाळला पाहिजे, त्याचा फायदा लोकांना आणि उद्योजकांना झाला पाहिजे, यासाठी मी ते पत्र लिहिलं आहे," असं स्पष्टीकरण उदय सामंतांनी दिलं आहे.

दरम्यान, 'मी ४ तारखेला पत्र लिहिल्यानंतर यावर ५ तारखेला पत्रकार परिषद घ्यावी लागणार, हे मला माहीत होतं. उलट हे पत्र आज १० तारखेला म्हणजे सहा दिवस उशिरा तुमच्यापर्यंत पोहोचलं," असा टोलाही सामंत यांनी लगावला. 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार