शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत ‘एमआयएम’मध्ये धुमश्चक्री!

By admin | Updated: April 7, 2015 04:17 IST

महापालिका निवडणुकीसाठी अवघे १६ दिवस शिल्लक राहिले असताना मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाच्या ४४ उमेदवारांची अधिकृत यादी

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीसाठी अवघे १६ दिवस शिल्लक राहिले असताना मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाच्या ४४ उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर होताच शहरात इच्छुक उमेदवारांनी ‘एमआयएम’च्या नेत्यांचे अक्षरश: पानिपत केले. तलवारीने हल्ले, दगडफेक, मारामाऱ्या, स्थानिक नेत्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यात आली. एमआयएमची वाताहत राहणारे समर्थक चक्कवर्तमानपत्रांच्या छायाचित्रकारांच्या अंगावर धावून येऊ लागले. रात्री उशिरापर्यंत ‘एमआयएम’मध्ये राडा सुरूच होता.‘एमआयएम’ ने शहरात ६० पेक्षा अधिक जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. काही वॉर्डांमध्ये इच्छुकांची संख्या जास्त होती. त्यामुळे तिकिटासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती. मध्यरात्री एमआयएमने दोन स्थानिक उर्दू वर्तमानपत्रांना ४४ उमेदवारांची यादी दिली. यादीमध्ये आपले नाव नसल्याचे लोटाकारंजा वॉर्डातील काही कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मध्यरात्रीनंतर ३ वाजता भडकलगेट चौकातील एका हॉटेलकडे मोर्चा वळविला. या हॉटेलमध्ये हैदराबादहून आलेले एमआयएमचे नेते थांबले होते. हॉटेलच्या रूममध्ये शिरून कार्यकर्त्यांनी नेत्यांना बेदम चोप दिला. एकाने तर तलवारच उगारली. हाणामारीत एका कार्यकर्त्याच्या हातावर तलवारीचा वार बसला. परिस्थिती चिघळत असल्याने हॉटेल मालक सलीम मैदेवाला आणि त्यांच्या मुलाने कार्यकर्त्यांना बाहेर काढले. (प्रतिनिधी)