शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

वॅगनमधून लाखो रुपयांच्या कोळशाची चोरी

By admin | Updated: June 23, 2014 01:11 IST

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात जिल्ह्यातील कोळसा खाणीतून रेल्वेगाडीच्या माध्यमातून कोळसा आणला जातो. मात्र या गाडीतून कोळशाची खुलेआम चोरी केली जात असल्याची माहिती आहे.

संबंधितांचा कानाडोळा : धावत्या रेल्वेतूृन फेकला जातो कोळसाचंद्रपूर: चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात जिल्ह्यातील कोळसा खाणीतून रेल्वेगाडीच्या माध्यमातून कोळसा आणला जातो. मात्र या गाडीतून कोळशाची खुलेआम चोरी केली जात असल्याची माहिती आहे.दररोज लाखोंचा कोळसा चोरला जात असतानाही वीज केंद्राचे अधिकारी व पोलीस विभाग यापासून अनभिज्ञ कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.महाऔष्णिक वीज केंद्राला घुग्घुस, माजरी कोळसा खाणीतून रेल्वेगाड्यांच्या माध्यमातून कोळसा पुरविला जातो. या रेल्वेगाड्या काही ठिकाणी थांबतात. त्यावेळी रेल्वेमध्ये २० ते २५ युवकांचे टोळके चढतात. धावत्या रेल्वेमधूनच कोळसा खाली फेकला जातो.ज्या ठिकाणी रेल्वेची गती मंदावते, तिथून हे टोळके पटापट खाली उड्या मारतात. खाली फेकलेला कोळसा मग जमा करून त्याची काळ्याबाजारात विक्री केली जाते. मागील वर्षभरापासून हा गोरखधंदा नित्यनेमाने सुरू असतानाही याकडे अद्याप कुणाचे लक्ष जाऊ नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चंद्रपूर वीज केंद्रात निकृष्ट कोळसा हा नेहमीचाच वादाचा विषय राहिला आहे. यामुळे दरवर्षी वीज केंद्राला कोट्यवधींचा फटका बसतो. तसेच ट्रकद्वारे पुरविण्यात येणाऱ्या कोळशामध्येही नेहमीच हेराफेरी केली जात असल्याचे अनेक प्रकार यापूर्वीच उघडकीस आले आहेत. काही महिन्यांपूर्वी कोळसा चोरीसंदर्भात वीज केंद्र प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याने चोरट्यांनी हा नवा मार्ग शोधून काढल्याची माहिती आहे. भरदिवसा रेल्वेगाड्यातून कोळसा काढला जातो. रात्रीही हा प्रकार सुरूच असतो. घुग्घुस येथून व्हॅगनमध्ये कोळसा भरून तो रात्री तीन फेऱ्यांमध्ये वीज केंद्रापर्यंत आणला जातो. वाटेत कोळसा भरून येणारी रेल्वेगाडी घुग्घुस रेल्वे साईट, ताडाळी पुलाजवळ आणि महेशनगर तुकूम या ठिकाणी थांबते. या ठिकाणाहून कोळसा चोरटे व्हॅगनमध्ये चढतात व कोळशाची लूट केली जाते. (शहर प्रतिनिधी)